मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : परेल नाका पोस्ट ऑफिस, भोईवाडा कोर्ट वार्डातील जनता पुन्हा काँग्रेसला संधी देणार का?, काय असणार सत्तेची गणितं?

BMC Election 2022 : परेल नाका पोस्ट ऑफिस, भोईवाडा कोर्ट वार्डातील जनता पुन्हा काँग्रेसला संधी देणार का?, काय असणार सत्तेची गणितं?

नव्या प्रभाग रचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 210 मध्ये केईएम हॉस्पिटल, परेल नाका पोस्ट ऑफिस, भोईवाडा कोर्ट, टाटामिल कंपाऊंड या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 210मध्ये (Ward no. 210) मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) वर्चस्व दिसले होते. काँग्रेसच्या सोनम जामसुटकर (Sonam Jamsutkar) याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 210बाबत. नव्या प्रभाग रचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 210 मध्ये केईएम हॉस्पिटल, परेल नाका पोस्ट ऑफिस, भोईवाडा कोर्ट, टाटामिल कंपाऊंड या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. वार्ड क्रमांक 210 मध्ये काँग्रेसच्या सोनम जामसुटकर याठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचा पराभव केला होता. मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात काँग्रेसने बाजी मारली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 210चा विचार केला तर येथील जनता पुन्हा काँग्रेसला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या