मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर वार्डात काँग्रेसचा बालेकिल्ला, यावेळी समीकरण बदलणार का?

BMC Election 2022 : बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर वार्डात काँग्रेसचा बालेकिल्ला, यावेळी समीकरण बदलणार का?

वार्ड क्रमांक 150 मध्ये राहुल नगर, बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर, नवीन गरीब जनता नगर या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 150 मध्ये राहुल नगर, बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर, नवीन गरीब जनता नगर या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 150 मध्ये राहुल नगर, बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर, नवीन गरीब जनता नगर या भागांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 150चा (Ward no. 150) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी काँग्रेसने (Congress) बाजी मारली होती. काँग्रेसच्या संगीता चंद्रकांत हंडोरे याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 150 बाबत. वार्ड क्रमांक 150 मध्ये राहुल नगर, बृहन्मुंबई महापालिका कॉलनी, ज्योती नगर, नवीन गरीब जनता नगर या भागांचा समावेश होतो. मागच्या निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. काँग्रेसच्या संगीता चंद्रकांत हंडोरे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 8046 इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर कृष्णा माने हे उमेदवार होते. या वार्डात मागच्या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर नोटाला  341 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार आणि पक्ष पुढीलप्रमाणे -  अरुणा काकड (शिवसेना) विनोद बापू झगडे( महाराष्ट्र नवनिर्माण सेना) प्रभाकर आशाराम ढवळे (AIMIM) आठवले मयूर रामचंद्र (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) कृष्णा अण्णा माने (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जितू बाबुराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) प्रशांत महादेव शिवलकर (बहुजन समाज पक्ष) कुमार चिंतामणी थोरात (भारिप बहुजन महासंघ) विशाल शाम वाघमारे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) भुजलिंग भिवा सोनवणे (अपक्ष) सय्यद मोहिनुद्दीन मोईदीन (अपक्ष) अनिता किरण पटोले (अपक्ष) अशोक रामा पाटील (अपक्ष) न्यायनीत भास्कर पांडुरंग (अपक्ष) सुवर्ण संदिप जाधव (अपक्ष) स्नेहा संजय भालेराव (अपक्ष) बाबासाहेब ज्ञानू बनसोडे (अपक्ष) वॉर्ड क्रमांक 150 ची एकूण लोकसंख्या 50391 इतकी आहे. यात अनुसूचित जातीचे 7616 आणि अनुसूचित जमातीचे 335 नागरिक आहेत. मागच्या निवडणुकीत एकूण 18669 वैध मतांची नोंद झाली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, तसेच वार्ड क्रमांक 150 हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या वेळच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या