मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : नायडू कॉलनी, साईबाबा नगरमध्ये 2017ला काँग्रेस विजयी; सध्याची परिस्थिती काय?

BMC Election 2022 : नायडू कॉलनी, साईबाबा नगरमध्ये 2017ला काँग्रेस विजयी; सध्याची परिस्थिती काय?

महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरू आहे.

महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरू आहे.

महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरू आहे.

    मुंबई, 7 ऑगस्ट : देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) मुंबईतील वार्ड क्रमांक 131बाबत (Ward no. 131) विचार केला तर याठिकाणी काँग्रेसचा (Congress) बोलबाला दिसला होता. 2017च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या राखी हरीश्चंद्र जाधव या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 131 बाबत. वार्ड क्रमांक 131मध्ये नायडू कॉलनी, म्हाडा कॉलनी, साईबाबा नगर, सावित्रीबाई फुले नगर आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. काँग्रेसच्या राखी हरीश्चंद्र जाधव यांनी ही निवडणूक जिंकली होती. विजयी उमेदवार यांनी शिवसेना, भाजप, मनसेच्या उमेदवारांना पराभूत केले होते. त्यावेळी 31414 मते वैध ठरली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. राखी हरीश्चंद्र जाधव, काँग्रेस - 12123
    2. भानुशाली मंगल, शिवसेना - 4701
    3. संदीप अंकुश राणे, मनसे - 899
    4. शिराळ कावेरी ज्ञानेश्वर, बसप - 143
    5. भालचंद्र शिरसाट, भाजप - 11375
    6. विनय विद्याधर आचरेकर, आरपीआय - 104
    हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेकडे पाहिले जाते. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरू आहे. मागच्या वेळी काँग्रेसच्या राखी हरिश्चंद्र जाधव या विजयी झाल्या होत्या. यावेळी या वार्डात काय होते, ते पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या