मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे.
(BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड कर्मांक 110 सोनापूर भांडूपबाबत
(Ward no. 110 Sonapur Bhandup) बोलायचे झाले तर 2017च्या निव़डणुकीत या वार्डात काँग्रेसने
(Congress) बाजी मारली होती.
याठिकाणी काँग्रेस उमेदवार आशा सुरेश कोपरकर यांचा विजय झाला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 110 बद्दल...
2017च्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी जर पाहिली तर काँग्रेस उमेवादाराचा एकतर्फी विजय झाल्याचे दिसते. काँग्रेस उमेदवार आशा कोपरकर यांना 5174 इतकी मते मिळाली होती. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भाजप उमेदवार संध्या त्रिपाठी या होत्या.
उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
- आशा सुरेश कोपरकर, काँग्रेस - 5174
- संध्या सुरज त्रिपाठी, भाजप - 4696
- चिराथ हरिनाक्षी मोहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 3732
- संगिता गोपीनाथ पाटील, शिवसेना - 3340
- सिंह सुशीला डी. आर. - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) - 1085
- फरहीन शेख, राष्ट्रवादी काँग्रेस - 987
- मिश्रा दुर्गेशनंदिनी अरविंद, अपक्ष - 114
- नसीमा अजीम सैय्यद, अपक्ष - 47
- हाफीजा बानो शेख, बसपा - 322
- सुजाता संजय उमाळे, भारिप बहुजन महासंघ - 312
हेही वाचा - BREAKING : विधान परिषदेच्या तोंडावर अनिल परबांना ईडीची नोटीस, चौकशीला बोलावले!
नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे.
शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 110ची जनता नगरसेवक पदाची माळ कुणाच्या गळ्यात घालते, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.