मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'यायचं असेल तर या, पण सरकारला डिस्टर्ब करू नका', दानवेंची उद्धव ठाकरेंना ऑफर!

'यायचं असेल तर या, पण सरकारला डिस्टर्ब करू नका', दानवेंची उद्धव ठाकरेंना ऑफर!


'उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही.

'उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही.

'उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 07 ऑगस्ट : 'उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही. त्यांना भाजपमध्ये यायचं असेल तर यावं पण पण आताच्या सरकारमध्ये त्यांनी डिस्टर्ब करू नका, असा सल्लावजा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन झाले आहे. पण, शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेला सोबत येण्यासाठी हाक देत आहे. याच मुद्यावर रावसाहेब दानवे यांनी आपल्या शैलीत टीव्ही ९ मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 'उद्धव ठाकरेंनी भाजपमध्ये यावं की नाही यावं, हे म्हणण्यासाठी आम्ही काय आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचं असेल तर त्यांना मागच्या घटनांबद्दल त्यांना पश्चाताप झाला असेल तर आम्ही कुठं नाही म्हटलो आहे. पण, यावे आमच्यासोबत राहावे, पण जे सरकार स्थापन झाले आहे, त्याला डिस्टर्ब करू नका, असा सल्लावजा टोला दानवेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आम्ही दरवर्षी सर्व कार्यकर्ते आणि नेते हे लोकांमध्ये जाऊन त्यांना सरकारच्या निर्णयाबद्दल माहिती देत असतो. मी सुद्दा झारखंडला जाणार आहे. निर्मला सीतारमण या बारामतीमध्ये जाणार आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे चॅलेंज नाही. युती असताना ६ आणि युती नसताना ४ खासदार निवडून आले आहे. त्यामुळे ते काही आमचे चॅलेंज नाही, असा टोलाच दानवेंनी राष्ट्रवादीला लगावला. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो. आज काही दिवस उद्धव ठाकरे सोबत होते. २५ वर्ष ते आमच्यासोबत होते. मग २५ व्या वर्षी त्यांना आमच्यासोबत युती वाया गेलेचं कळलं आणि त्यांनी युती तोडली. ज्या युतीला या राज्याने मतदान केलं होतं, त्या लोकांना दगा देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. ते आमचे मित्र होते, आता ते पूर्व मित्र आहे. एकनाथ शिंदे हे नवे मित्र आहे. मैत्री दिनाच्या दिवशी शिंदे गटातून कुणी शुभेच्छा दिल्या असतील तर वेगळा अर्थ काढू नका, असंही दानवे म्हणाले. केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे, की आमचे जुने वाद पेटले आहे. मागच्या गोष्टी सोडून द्या, त्यामुळे यावर आता काही बोलण्यासारखं नाही, अशी प्रतिक्रिया दानवेंनी केसरकर आणि राणे वादावर दिली. '२०१४ पेक्षा जास्त मताने आमचे सरकार आहे, आता २०२४ ला निवडणुका आहे. ज्या दिवशी आम्ही निवडणूक जिंकत असतो, त्या दिवशीच पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतो. त्यामुळे मिशन ४५ नसून ४८ आहे. तुम्ही माझी जालन्याची जागा सोडत आहे का, संपूर्ण ४८ जागा आम्ही जिंकणार आहोत' असा दावाही दानवेंनी केलाय
First published:

पुढील बातम्या