मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shrikant Shinde Viral Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की श्रींकात शिंदे 'त्या' फोटोवरून विरोधकांकडून जोरदार टीका

Shrikant Shinde Viral Photo : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की श्रींकात शिंदे 'त्या' फोटोवरून विरोधकांकडून जोरदार टीका

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते कोणत्या कोणत्या कारणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. (Shrikant Shinde Viral Photo)

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते कोणत्या कोणत्या कारणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. (Shrikant Shinde Viral Photo)

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते कोणत्या कोणत्या कारणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. (Shrikant Shinde Viral Photo)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 24 सप्टेंबर : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते कोणत्या कोणत्या कारणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली. परंतु या खुर्चीवर त्यांचे चिरंजीव बसल्याचा फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी जोरदार आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत कि श्रींकात शिंदे आहेत असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या खुर्चीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे बसले असल्याचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य नेटकऱ्यांनी सोशल मिडीयात व्हायरल केले. या प्रकरणी श्रीकांत शिंदे यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर ? असे सवाल युवक राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी केले.

हे ही वाचा : निर्मला सीतारामन आणि अजितदादा आज बारामतीत आमनेसामने!

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून अधिकाऱ्यांना आदेश देणारे खासदार श्रीकांत शिंदे तुम्ही सुपर सीएम झालात का ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. याचबरोबर मनिषा कायनाडे म्हणाल्या कि, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला? शेठ नसले तरी धाकले शेठ दुकान चालवतायत अशा शब्दात विरोधकांनी टीका केली आहे.

श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीवर बसून नागरिकांची निवेदने स्वीकारत आहेत, त्या खुर्चीच्या मागे मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन असा फलक आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी खुलासा केला आहे.

हा फोटो घरातील आहे श्रीकांत शिंदे यांचा खुलासा…

भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या आम्ही घरातूनही सोडवतो. हे छायाचित्रही वर्षावरील नाही तर खासगी निवासस्थानातील आहे. घरात मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणारा फलक आहे.

हे ही वाचा : चुकीच्या बातम्या दिल्या तर...,लंपीरोगाबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट इशारा

मुख्यमंत्री जेव्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेतात तेव्हा या फलकाचा वापर केला जातो. मी काम करत असताना ज्या खुर्चीवर बसलो होतो त्या खुर्चीच्या मागे तो फलक होता. कुणीतरी हा फोटो काढला. असे श्रीकांत शिंदे म्हणाले..

First published:

Tags: Cm eknath shinde, NCP, Shiv Sena (Political Party), Social media, Viral photo