मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आता..

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आता..

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेना पक्ष कोणाचा? यावर सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे अशी न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची, याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू होणार आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसेना पक्ष नेमका कोणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, अशी विरोधी पक्षांची मागणी होती, ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग जे काही निकष असतील त्याच्यानुसार निर्णय घेईल, अशी मोजकी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पुढे काय होणार?

निवडणूक आयोग शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तसंच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, याची सगळ्यात आधी पडताळणी करेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार हे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने आहेत, पण पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावं लागणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रही देण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेनेचे आमदार-खासदार तसंच पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याचीही शक्यता आहे.

वाचा - Maha Political Crisis : एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा, पुढची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात

यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात.

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार देशातल्या प्रत्येक पक्षाला प्रत्येक 5 वर्षांनी संघटनात्मक निवडणूक घ्यावी लागते. या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुखासह इतर पदांचाही समावेश असतो. याआधी 2018 साली शिवसेनेमध्ये अंतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये झालेल्या नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली.

First published:

Tags: Eknath Shinde, Supreme court