मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीचे सत्र सुरू झाले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे हे आपल्यासोबत 40 आमदारांनीही घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. महाराष्ट्र सदनातील बॅक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम बुक करण्यात आल्या आहेत. जवळपास 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती आहे. विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? मुंबई पालिकेचं ठरलं पण निर्णय ढकला पुढे!)
दरम्यान, मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 30 मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. आता या वादानंतर शिंदे हे दिल्लीला चालले आहे.
दिल्लीत शिंदेंचं ऐकतील का? जयंत पाटलांचा टोला
तर, वेदांत फॉक्सकॉन प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत हे दिल्लीला जात आहेत. परंतु ते एकटे जाऊन काय उपयोग होणार. मुख्यमंत्री गेल्याशिवाय काही मिळणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचे जेवढे दिल्ली ऐकते तेवढं मुख्यमंत्री शिंदेंचं ऐकेल काय? त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे सोबत दिल्लीला गेले तर हे सरकार गंभीर आहे, असे मी समजतो. मुख्यमंत्री जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन गेले नाही तर मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीत भेटही मिळणार नाही, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.