मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : 3 महिन्यांपूर्वी कार्यक्रम केल्यामुळे..., दसरा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदेंचं मोठ विधान

Dasara Melava : 3 महिन्यांपूर्वी कार्यक्रम केल्यामुळे..., दसरा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदेंचं मोठ विधान


अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Navi Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटाचा आज ऐतिहासिक असा दसरा मेळावा पार पडणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेच्या नावाखाली दोन मेळावे होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा हा पहिलाच मेळावा आहे. '3 महिन्यापूर्वी आम्ही जोरात कार्यक्रम केल्याने, उद्याचा दसरा जोरात होणार आहे' अशी उत्स्फु्र्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नवी मुंबई तील ऐरोली येथे विजय चौगुले आयोजित नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

गणपती उत्सव जोरात झाला,नवरात्र उत्सव जोरात आहे आणि तीन महिन्यापूर्वी आम्ही जोरात कार्यक्रम केला, त्यामुळे तुमचे कार्यक्रमही जोरात आहेत. त्याच प्रमाणे उद्याचा दसरा देखील जोरात होणार असून दिवाळी देखील जोरात होणार आहे, असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(Dasara Melava : मुख्यमंत्र्यांची 'मोदी स्टाईल', दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणार!)

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,' असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. दसरा मेळाव्यासाठी जवळपास अडीच-तीन लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 'दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,' अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मध्यवर्ती मैदानात होणार आहे. या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचंही लक्ष लागलंय. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याची सुरूवात संध्याकाळी 4 वाजता शिवसेनेच्या नव्या गीतांनी होणार आहे. तर नेत्यांची भाषणं संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होतील.

(Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, राजकीय वातावरण तापलं, पण... असा आहे मुंबईचा Weather Report)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री 12 फुटांची चांदीची तलवार सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देतील. या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून किरण पावस्कर, शितल म्हात्रे, शरद पोंक्षे, आनंदराव अडसूळ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, रामदास कदम या नेत्यांची भाषणं होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.

First published: