मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईतील 4 विशेष रेल्वेगाड्यांच्या वाढल्या फेऱ्या; तिकिट बुक करण्याआधी पाहा वेळापत्रकातील बदल

मुंबईतील 4 विशेष रेल्वेगाड्यांच्या वाढल्या फेऱ्या; तिकिट बुक करण्याआधी पाहा वेळापत्रकातील बदल

रेल्वे विभागानं मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया, बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या चार विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत

रेल्वे विभागानं मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया, बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या चार विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत

रेल्वे विभागानं मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया, बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या चार विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत

मुंबई 02 ऑगस्ट: भारतीय रेल्वेच्यावतीनं (Indian Railways) देशातील विविध विभागांत विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने चार विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात वाढ केली गेली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तिकीट बुक करण्याच्या आधी सर्व तपशील तपासून घेण्याचं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. रेल्वे विभागानं मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया, बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या चार विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. याशिवाय वाराणसी आणि गोंडादरम्यान धावणाऱ्या 14213 व 14214 या क्रमांकाच्या रेल्वेची सेवा पूर्ववत होण्यास विलंब होणार असल्याचं रेल्वे विभागानं कळवलं आहे. दरम्यान, ज्या चार विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत त्यांच्या वेळा, थांबे (Stoppages) आणि मार्गात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. गाडीच्या डब्यांमध्ये (Train Rack) बदल करण्यात आलेला आहे. आता या गाडीत वातानुकुलिक द्वितीय श्रेणीचा (Air Conditioned Second Class) 1 डबा, वातानुकुलित तृतीय श्रेणीचे (Air Conditioned Third Class) 3, शयनयान श्रेणीचे (Sleeper Class) 8, साधारण द्वितीय श्रेणीचे 3 कोच असतील. तसंच एसएलआरडीच्या दोन डब्यांसह एकूण 17 डबे असणार आहेत. चार विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये अशा प्रकारे होणार वाढ 1) मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया (क्र.01025) तीन आठवड्यातून एकदा धावणारी विशेष रेल्वे आहे. ती 29 जुलै 2022 पर्यंत धावणार होती. पण आता ही गाडी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावेल. गाडीच्या 27 फेऱ्या वाढवल्या आहेत. 2) बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनिस (क्र.01026) ही त्रैसाप्ताहिक विशेष रेल्वे 31 जुलै 2022 पर्यंत धावणार होती. पण आता गाडीच्या वेळापत्रकात बदल केला असून ती 30 सप्टेंबर 2022 पर्यंत धावणार आहे. प्रत्येक बुधवार, शुक्रवार तसेच रविवारी गाडी धावेल. या गाडीच्या 27 फेऱ्या वाढवल्या आहे. 3) लोकमान्य टिळक टर्मिनिस-गोरखपुर (क्र.01027) ही विशेष रेल्वे 31 जुलै 2022 पर्यंत आठवड्यातून चार दिवस धावणार होती. आता ही रेल्वे 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रत्येक मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार असे धावणार आहे. गाडीच्या 36 फेऱ्या होतील. 4) गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (क्र.01028) ही गाडी 2 ऑगस्ट 2022 पर्यंत धावणार होती. आठवड्यातून चार दिवस गाडी धावण्याचे नियोजन होते. आता 27 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रत्येक सोमवार, मंगळवार, गुरूवार व शनिवारी धावणार आहे. वाराणसी-गोंडा-वाराणसी एक्स्प्रेसचं वेळापत्रक बदललं उत्तर रेल्वे विभागाच्या लखनऊ मंडळातील बाराबंकी-अयोध्या कँट-अकबरपूर-जफराबाद खंड येथील अकबरपूर-कटहरी-गोसाईगंज स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्री नॉन इंटरलॉक व नॉन इंटरलॉकचे काम केले जाणार आहे. परिणामी वाराणसी-गोंडा-वाराणसी (क्र.14213/14214) ही रेल्वेची सेवा पूर्ववत होण्यासाठी विलंब होणार आहे. पूर्वी 1 आणि 2 ऑगस्ट 2022 पासून रेल्वे धावणार होती. पण आता 8 आणि 9 ऑगस्ट 2022 पासून ही गाडी धावणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गर्दी जशी वाढते त्याप्रमाणे विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. प्रवास करताना गाड्यांच्या नवीन वेळापत्रकाचीही माहिती करून घेणं तितकंचं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या वेळापत्रकाची खात्री करून घेण्याचं आवाहन रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Indian railway, Train

पुढील बातम्या