मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बंदुकीगिरी भोवली, सदा सरवणकर यांच्यासह मुलावरही गुन्हा दाखल

बंदुकीगिरी भोवली, सदा सरवणकर यांच्यासह मुलावरही गुन्हा दाखल

सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 सप्टेंबर : शिवसेनेचा  (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये वाद चांगलाच चिघळला आहे. बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकऱणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह त्यांच्या मुलगा समाधान सरवणकर यांच्याही त्यात समावेश आहे. एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

दादरमध्ये मध्यरात्री शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यानंतर आज दुपारी दादर पोलीस स्थानकाच्या बाहेर लागलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले असून सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर देखील दगदफेक करण्यात आली आहे. त्यामुळे दादरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील घातक कलम 395 वगळलं गेलंय तर आमदार सदा सरवणकर,समाधान सरवणकर यांच्याविरोधात अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र,यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह स्मिता महेश सावंत यांच्यावर जहरी टीका केली आहे. खोटी कामं करायचे धंदे बंद करा असा थेट इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

(पृथ्वीराज चव्हाणांच्या मनात चाललंय काय? काँग्रेसचे कार्यकर्तेही गोंधळले)

सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर ठाकरे गटाच्या ५ ही जणांना जामिनावर सोडले जाणार आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. '2 पोरांना सांगायचं त्यांनी दगडफेक करायची हे शिवसेनेचे धंदे आहे. हिंमत असेल तर आदित्य आणि वरुण यांना दगड मारायला पाठवा ना. गोरगरीब शिवसैनिकांचा वापर का करता. उद्धव ठाकरे हे धंदे बंद करा, आम्हीही तेच करायला सुरुवात केली तर महागात जाईल, असा इशारा किरण पावस्कर यांनी दिली.

First published: