मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिन्याभरानंतर मिळाला मुहुर्त, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं, दीपक केसरकरांनी दिले स्पष्ट संकेत

महिन्याभरानंतर मिळाला मुहुर्त, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं, दीपक केसरकरांनी दिले स्पष्ट संकेत


शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 02 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. आता 3 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. (VIDEO:हडपसरमध्ये 'एकनाथ शिंदे' उद्यान वादात,वैयक्तिक नामकरणास संस्थांचा विरोध) अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळांची उद्या बैठक झाल्यावर विधिमंडळ कामकाज समितीची BAC बैठक होणार आहे.  याचा अर्थ पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे हे स्पष्ट संकेत आहेत. जर राज्य सरकार असं नियोजन करत असेल तर त्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ही होणार हे देखील स्पष्ट आहे. जेणेकरून नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अभ्यास करून विधिमंडळात येता येईल आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरंही देता येईल. लवकरच विस्तार होईल -एकनाथ शिंदे तर 'आमचं सरकार चांगलं चाललंय आहे, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना थांबली होती. ती परत सुरू केली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले आहे. दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक छोटे मोठे निर्णय घेतले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या