मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : मंदिरं, सिनेमागृहाचे दार बंदच राहणार, राज्य सरकार ठाम

BREAKING : मंदिरं, सिनेमागृहाचे दार बंदच राहणार, राज्य सरकार ठाम

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोनाची (corona) लाट आटोक्यात आल्यामुळे दुकानं (shops), हॉटेल्स (hotels) आणि बाजारपेठा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पण, धार्मिक स्थळं (Temples) आणि सिनेमागृह (cinema halls) बंदच राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) निर्णय घेण्यात आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी याबद्दल रितसर माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. आज मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विभागाकडून निर्बंध कमी करण्याबाबत प्रस्ताव गेला होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे तसं हॉटेल्स आणि मॉल सुरू करण्याबाबत टोपे यांनी घोषणा केली आहे.

सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, खरेदी करण्याआधी इथे तपासा प्रति तोळा सोन्याचा भाव

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता धार्मिक स्थळं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे बंद राहणार पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. त्याच बरोबर,

सिनेमागृह , नाट्यगृह सुद्धा बंद राहणार आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

तसंच, लोकल ट्रेन २ डोस झालेल्यांना प्रवास करायला मान्यता दिले आहे. मासिक आणि त्रिमासिक पास असेल, बळजबरीने प्रवास केला तर ५०० रू दंड भरावा लागणार आहे.

सर्व दुकाने १० वाजेपर्यंत सुरू असण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपहार गृहांना ५०% आसनावर मान्यता देण्यात आली आहे. उपहारगृहात जे लोक वेटिंगमध्ये असतील त्यांना मास्क घालणे अनिवार्य, वेटर आणि कर्मचारी यांनी दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. ५० % क्षमतेनं लोकांना उपहार गृहात प्रवेश दिला जाणार आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

सर्व कार्यालयांमध्ये शासकीय आणि निमशासकीय यांना लस देण्याचे प्राधान्य देणार आहे. तसंच, २४ तास खाजगी कार्यालये सुरू राहू शकतील हा निर्णय घेण्यात आला आहे. इनडोअर स्पोर्टस सुरू असतील त्याला मान्यता देण्यात आली आहे, असंही टोपेंनी सांगितलं.

चाळीशीतच तिसरं Transplant, शरीरात बसवली पाचवी किडनी

'शॉपिंग मॉल १० पर्यंत सुरू असणार मात्र दुसरा डोस घेणे अनिवार्य, दुसरा डोस झालेल्यांनाच प्रवेश दिला जाईल' असंही टोपे म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा विचार करता २०० मेट्रिक टन ऑक्सीजन वाढवणार आहे.  १४१ ऑक्सीजन प्लांटना मान्यता दिली आहे. ३८०० मेट्रीक टन ऑक्सीजन लागू शकतो, तिसऱ्या लाटेत ७०० मेट्रीक टन ऑक्सीजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल, असा इशाराही टोपेंनी दिला.

शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स बाबात मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्यानंतर अंतिम निर्णय येईल. कुलगुरू यांच्याकडून अहवाल घेतल्यानंतर कॉलेजच्या बाबतीत निर्णय असेल. शाळा कॉलेज सुरू करण्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल, असंही टोपेंनी सांगितलं.

First published: