मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गोविंद पानसरे हत्या प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश

या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. याबाबत 1 ऑगस्टपर्यंत स्पष्ट उत्तर देण्याचे आदेश सरकारला दिले गेले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 22 जुलै : गोंविद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. याबाबत 1 ऑगस्टपर्यंत स्पष्ट उत्तर देण्याचे आदेश सरकारला दिले गेले आहेत.

'गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तपास संथगतीने होत आहे. त्यामुळे हा तपास एसआयटीकडून घेत तो एटीएसकडे सोपवण्याचा आदेश द्यावा', अशी विनंती मेघा पानसरे यांनी अर्जाद्वारे केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, वरिष्ठ अधिकारी आजारी असल्याने याबद्दल आवश्यक सूचना मिळू शकल्या नाहीत, असं विशेष सरकारी वकिलांनी म्हटलं.

DSK ना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका होणार?

यानंतर राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर हा विषय असाच रखडवला जाऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत 1 ऑगस्टपर्यंत स्पष्ट उत्तर द्या आणि तुमचा निर्णय कळवा, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.

काय आहे प्रकरण -

कामगारासाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ भ्याड हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निग वॉक करून घरी परतत होते त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचारीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उपचारादम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Mumbai high court