Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : मागच्या वेळी शंकरवाडी वार्डात भाजप विजयी; मात्र, नगसेवक शिवसेनेचा यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : मागच्या वेळी शंकरवाडी वार्डात भाजप विजयी; मात्र, नगसेवक शिवसेनेचा यावेळी काय होणार?

2017मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार केला तर हे वार्ड ओबीसींसाठी राखीव होते.

    मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 81चा (Shankarwadi Ward no. 81) जर विचार केला तर याठिकाणी 2017मध्ये भाजप उमेदवाराला जास्त मते मिळाली होती. मात्र, वर्षभरातच त्यांचे नगरसेवक पद न्यायालयाने रद्द केलं. यानंतर याठिकाणी शिवसेना उमेदवार संदीप नाईक हे नगरसेवक पदी विराजमान झाले होते. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 81 बद्दल... 2017मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार केला तर हे वार्ड ओबीसींसाठी राखीव होते. त्यामुळे शिवसेनेने संदीप नाईक यांना तिकिट दिले होते. मात्र, आताची परिस्थिती पाहता हे वार्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे येथील सत्तेची गणितं आपसूकच बदलणार आहेत. 2017मध्ये संदीप नाईक हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होते. तरीसुद्धा त्यांनी याठिकाणी बाजी मारली होती. या वॉर्डात आघाडी नगर, प्रभागात शंकरवाडी, शेर-ए- पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगर, ईएसआयसी हॉस्पिटल आदी प्रमुख वस्त्या येतात. या वस्त्यांमधूनच उमेदवारांचं भवितव्य ठरत असतं. या वॉर्डाची लोकसंख्या 56,642 इतकी आहे. या वॉर्डात अनुसूचित जातीची लोकसंख्या 961 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 560 आहे. तसेच या मतदारसंघात गेल्यावेळी 39 हजार 751 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यापैकी 22355 मते वैध ठरली होती. म्हणजे एकूण 17396 मते बाद ठरली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका कमी मते मिळालेला उमेदवार झाला होता नगरसेवक कारण... 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 81 मध्ये भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना 10 हजार 867 मते मिळाली होती. ते विजयी झाले होते. मात्र, मुरजी पटेल यांचे ओबीसी प्रमाणपत्र बोगस आहे, अशी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. वर्षभर हा खटला चालला. यानंतर न्यायालयाने मुरजी पटेल यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र बोगस आहे, असे म्हणत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेला मते मिळाली होती. यामुळे शिवसेनेचे संदीप नाईक हे नगरसेवक झाले. सध्याची परिस्थिती पाहता हा वार्ड महिलांसाठी राखी झाला आहे. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या