मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी दहिसर पश्चिम, शास्त्री नगर वार्डात चालली भाजपची जादू; यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : मागच्या वेळी दहिसर पश्चिम, शास्त्री नगर वार्डात चालली भाजपची जादू; यावेळी काय होणार?

2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार हरिश छेडा हे याठिकाणाहून निवडून आले होते.

2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार हरिश छेडा हे याठिकाणाहून निवडून आले होते.

2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार हरिश छेडा हे याठिकाणाहून निवडून आले होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 27 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 8 बाबत (Ward no. 8 BMC) विचार केला तर याठिकाणी 2017च्या मनपा निवडणुकीत भाजपची (BJP) जादू चालली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 8 बद्दल. वार्ड क्रमांक 8 मध्ये मेरी इमॅल्युकेट स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, भगवती हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी मंडपेश्वर, एचसीजी अॅपेक्स कॅन्सर सेंटर, एस लिंक रोड, वीर हनुमान नगर, दहिसर पश्चिम, एस लिंक रोड, सेंट थॉमस चर्च, लाल बहादूर शास्त्री नगर, म्हात्रे वाडी या भागांचा समावेश आहे. या वार्डाची लोकसंख्या 44558 इतकी आहे. यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 1309 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 810 आहे. या वार्डात एकूण 32997 मतदार आहेत. त्यापैकी 19453 जणांनी मतदान केले. 2017 च्या मनपा निवडणुकीत हा वार्ड खुला होता. तसेच यावेळीसुद्धा हा वार्ड खुलाच आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार हरिश छेडा हे याठिकाणाहून निवडून आले होते. त्यांना 8534 तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या दीपा पाटील या होत्या. प्रमुख लढत ही भाजप आणि शिवसेनेतच पाहायला मिळाली होती. वार्ड क्रमांक 8मध्ये मागच्या वेळी सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार स्वबळावर उभे राहिले होते. तर याठिकाणी एकही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. नोटाला या निवडणुकीत 498 मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. हरीश छेडा, भाजप - 8534
  2. गणेश घोसाळकर, मनसे - 798
  3. रईस खान, राष्ट्रवादी - 1654
  4. दीपा पाटील, शिवसेना - 5644
  5. लौकीक सुत्राळे, काँग्रेस - 2325
  6. नोटा - 498
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर तेच दुसरीकडे 2017 मधील विजयी भाजप उमेदवार हरिश छेडा यांनी पाच वर्षात केलेली कामे, तसेच त्यांचा असलेला जनसंपर्क यासुद्धा गोष्टींवर मतदारांचे लक्ष राहणार आहे. याठिकाणची निवडणूक एकदम रंजक होणार आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या