Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : गोरेगाव स्पोर्ट क्लब वार्डात मागच्या वेळी भाजपची होती सरशी; यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : गोरेगाव स्पोर्ट क्लब वार्डात मागच्या वेळी भाजपची होती सरशी; यावेळी काय होणार?

वॉर्ड क्रमांक 47 हा खुल्या प्रवर्गातून निश्चित करण्यात आला आहे.

  मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 47बाबत (Ward no. 47 BMC) विचार केला तर 2017मध्ये याठिकाणी भाजपने विजयी पताका फडकावली होती. वार्ड क्रमांक 47मध्ये भाजप उमेदवार (Bjp Candidate) श्रीमती जया सतनामसिंग तिवाना या निवडून आल्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 47बद्दल. 2017मध्ये काय होती परिस्थिती - वॉर्ड क्रमांक 47 हा खुल्या प्रवर्गातून निश्चित करण्यात आला आहे. या वार्डमध्ये काच पाडा, एव्हर शाईन नगर, गोरेगाव स्पोर्ट क्लब परिसर ही प्रमुख ठिकाणे तसेच नहारनगर, भंडारवाडा मार्ग, चिंचोली बंदर रोड, एमडीपी रोड, पोईसर नदी, एव्हरशाईन नगर, अटलांटा इमारत, न्यू लिंक रोड, फादर जस्टीन रोड, चुन्नीलाल गिरीधारी लाल पटेल मार्ग आदी भागाचा समावेश आहे. 2017मध्ये या वार्डातून श्रीमती जया सतनामसिंग तिवाना यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेस उमेदवार पिंकी भाटियांना जोरदार टक्कर दिली होती. या वार्डची लोकसंख्या 51438 इतकी आहे. तर 2,347 इतकी अनुसुचित जाती आणि 393 इतकी अनुसूचित जमातीतील लोकांची संख्या आहे. त्यावेळी एकूण मतदारांची संख्या ही 40,012 इतकी होती. उमेदवार, पक्ष आणि मिळालेले मतदान (2017) - 
  1. शीतल चौधरी, मनसे -  545
  2. वेंकट जोसेफिन, अपक्ष - 672
  3. पूजा गणेश होनावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 57
  4. जी व्ही पिल्ले, अपक्ष - 56
  5. एस राजमणी सुब्रमण्यम, - एआयडीएमके - 238
  6. श्रीमती जया सतनामसिंग तिवाना,  भाजप -9301
  7. पिंकी भाटिया, काँग्रेस - 7486
  8. सुप्रिया विजय पवार, शिवसेना - 3463
  हेही वाचा - ''अजित पवारांनी पुन्हा आमच्यासोबत यावं'', भाजपची खुली ऑफर..! नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. वार्ड क्रमांक 72चा विचार केला तर 2017मध्ये भाजपने याठिकाणी निवडणूक जिंकली होती. त्यामुळे येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: BMC, Election, Mumbai

  पुढील बातम्या