Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : राठोडी गाव वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : राठोडी गाव वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

वार्ड क्रमांक 35मध्ये राठोडी गाव, खारोडी, बाफीरा नगर, न्यू महाकाली नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

    मुंबई, 6 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 35 बाबत (Ward no. 35 BMC) विचार केला तर याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार सेजल देसाई या याठिकाणी निवडून आल्या होत्या. आगामी मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 35 बाबत... सात उमेदवार होते रिंगणात -  वार्ड क्रमांक 35मध्ये राठोडी गाव, खारोडी, बाफीरा नगर, न्यू महाकाली नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. या वार्डात एकूण मतदारांची संख्या 45428 इतक आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यापैकी एकूण 25809 इतके मतदान झाले होते. तर यासोबत नोटालाही अनेकांनी प्राधान्य दिले होते. 2017मध्ये नोटाला 473 मतदान झाले होते. तर त्यावेळी या वार्डातून एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मनसेने आपला उमेदवार याठिकाणी दिला नव्हता. त्यावेळच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप उमेदवार सेजल प्रशांत देसाई यांना 13751 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या हींगु श्वेता शैलेश यांना 150, शिवसेना उमेदवार प्रभलीन बील्लाजी यांना 5624, काँग्रेसच्या पारुल मेहता यांना 5778, तर अपक्ष उमेदवार सुपडाबाई जंजाळे यांना 55, त्रिजा नाडार यांना 344, रुपा हितेन शहा यांना 107मते मिळाली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. वार्ड क्रमांक 35चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या