मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : भांडूप, आंबेडकर नगर वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळच्या लढतीची सर्वांना उत्सुकता

BMC Election 2022 : भांडूप, आंबेडकर नगर वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळच्या लढतीची सर्वांना उत्सुकता

वार्ड क्रमांक 112मध्ये भांडुप, तानसा पाइपलाइन, निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाबी कॉलनी, राम नगर, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी हे भाग येतात. (Bhandup Ward no. 112)

वार्ड क्रमांक 112मध्ये भांडुप, तानसा पाइपलाइन, निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाबी कॉलनी, राम नगर, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी हे भाग येतात. (Bhandup Ward no. 112)

वार्ड क्रमांक 112मध्ये भांडुप, तानसा पाइपलाइन, निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाबी कॉलनी, राम नगर, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी हे भाग येतात. (Bhandup Ward no. 112)

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 25 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 112 भांडूपचा (Ward no. 112 BMC Election) विचार केला तर मागच्या वेळी 2017मध्ये याठिकाणी भाजपचा विजय झाला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 112बद्दल... 2017मध्ये भाजच उमेदवार विजयी -  वार्ड क्रमांक 112मध्ये भांडुप, तानसा पाइपलाइन, निर्मल नगर, जयदेवसिंग नगर, पंजाबी कॉलनी, राम नगर, आंबेडकर नगर, एमएमआरडीए कॉलनी हे भाग येतात. (Bhandup Ward no. 112) 2017मध्ये याठिकाणी भाजप उमेदवार साक्षी दळवी निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेना उमेदवार जयश्री पाटील यांना पराभूत केले होते. तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रुचिरा राजेंद्र मोकल या होत्या. मतांचा विचार केला तर 2017मध्ये विजयी उमेदवार साक्षी दळवी यांना 7691 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या जयश्री जयवंत पाटील यांना 5845, राष्ट्रवादीच्या रुचिरा राजेंद्र मोकल यांना 2970 इतकी मते मिळाली होती. याठिकाणी त्याठिकाणी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड आणि अपक्ष, असे सात उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, भाजपने याठिकाणी बाजी मारली होती. त्यावेळी एकूण वैध मते 20855 इतकी होती. सर्वात कमी मते 88 ही संभाजी ब्रिगेडला मिळाली होती. पक्ष, उमेदवार आणि मिळालेली मते -
  1. भाजप – साक्षी दीपक दळवी – 7691
  2. मनसे - सुप्रिया सुजय धुरत – 1492
  3. राष्ट्रवादी काँग्रेस - रुचिरा राजेंद्र मोकल – 2970
  4. शिवसेना - जयश्री जयवंत पाटील – 5845
  5. अपक्ष - रशीदा गुलाब शेख – 129
  6. संभाजी ब्रिगेड - विद्या मनोहर शिंदे – 88
  7. काँग्रेस - अबोली बिपिंद्र विचारे – 2122
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. वार्ड क्रमांक 72चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे. तर मागच्या सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक लढवल्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. यावेळी काय होते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या