मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करा नाहीतर...'', ठिय्या आंदोलनानंतर प्रवीण दरेकर यांचा इशारा

''संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करा नाहीतर...'', ठिय्या आंदोलनानंतर प्रवीण दरेकर यांचा इशारा

या सभेपूर्वी रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. दगड मारुन या रथाच्या काचा देखील फोडण्यात आल्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी ही तोडफोड महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई, 19 एप्रिल: आजपासून भाजप (BJP) मुंबई पालिकेतल्या (bombay Municipal Corporation) भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी अभियान सुरु करत आहे. या सभेपूर्वी रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. दगड मारुन या रथाच्या काचा देखील फोडण्यात आल्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी ही तोडफोड महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur police station) ठिय्या आंदोलन केलं. पोलखोल रथ तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर(Praveen Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad)यासह नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

बीएमसी भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. याची पोलखोल करण्यासाठी आम्ही रथ अभियानाची सुरुवात आज केली. आणि त्याच रथाची तोडफोड केली. तोडफोडीचा,आमचा सत्ताधाऱ्यांवर आरोप असल्याचं दरेकर स्पष्ट म्हणाले. पोलिसांनी तक्रार घेतली आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर उद्या पुन्हा पोलीस ठाण्याला घेराव घालणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

अचलपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी भाजप शहराध्यक्ष, पुण्यातून अटक

CCTV फुटेज गायब केलं जाईल अशी आम्हाला भीती असून असे दगड फेकून भ्रष्टाचार लपवता येणार नाही. जर भाजप कार्यकर्त्यांनी जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं तर पोलीस जबाबदार असतील, अशी धमकी वजा इशारा दरेकरांनी दिलं आहे.

मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईत CCTV बसले. पोलिसांची भाषा आरोपींना पाठी घालणारी असं म्हणत फुटेज पुसट असल्याची पोलीस बतावणी करताय. आमचा कोणावर संशय हे आम्ही पोलिसांना सांगितलं असल्याचं ते म्हणालेत.

याप्रकरणावर पडदा पाडण्यासाठी,उगाच कोणाला मारून मुटकून, गर्दुल्ल्याला खोटा आरोपी करतील अशी आम्हाला भीती आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणालेत. राजश्री पलांडे यांनी तक्रारीत सत्ताधारी पक्ष कार्यकर्ते,किंवा त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दगडफेक केली असावी अशी शंका व्यक्त केली आहे.

कांदिवलीत BJP च्या पोल खोल सभेचा स्टेज उद्धवस्त, शिवसैनिकांकडून तोडफोड

भाजपच्या (BJP) पोल खोल सभेच्या (Pol Khol Sabha) स्टेजची शिवसैनिकांनी (Shiv Sena workers) तोडफोड (vandalized) केली आहे. मुंबईतल्या (Kandivali, Mumbai) कांदिवलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचं समजतंय. कांदिवलीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हा स्टेजची तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी झिंदाबादच्या घोषणाही दिल्यात. या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या परिसरात सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

First published:

Tags: BJP, Pravin darekar