मुंबई, 14 मार्च : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पेनड्राइव्ह बॉम्ब ( Pendrive Bomb) टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांनी हा पेन ड्राइव्ह आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या पेन ड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणसं मुस्लीम वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे.
(Devendra Fadnavis Target Thackeray Government) पुढे ते म्हणाले की, नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. मी पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत आहे. या पेन ड्राइव्हमधील दोन व्यक्तींची नावं डॉ. मुदाससीर लांबे आणि मोहम्मद अर्षद खान अशी आहेत. या दोघांना वक्फ बोर्डावर नियुक्त करण्यात आलं आहे. या महिलेने दोघांपैकी मुदाससीर लांबे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली, मात्र तरीही त्याला अटक केली नाही. मात्र महिलेच्या पतीला चोरीच्या आरोपातून अटक करण्यात आली आणि तो सध्या तुरुंगात आहे.
हे ही वाचा-शेतकरी पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली अन् पंचसूत्री कसली म्हणता? - फडणवीस
या पेन ड्राइव्ह बॉम्बमध्ये एक आहेत, मो. अरशद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दस्सिर लांबे.
संवाद : सलामवालेकूम
डॉ. लांबे : माझी अडचण माहिती आहे का? माझे सासरे दाऊदचे राईट हँड होते. सुरुवातीला माझं नातं हसिना आपाने जोडलं होतं. माझ्याकडून सोहेल भाऊ होते आणि तेथून हसिना आपा होत्या. हसिना आपा या दाऊदच्या बहीण आहेत. हसिना आपा आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी. म्हणजे दाऊदची वहिनी.
अर्शद खान : तू त्यांच्यासोबत अन्वरचं नाव तर ऐकलं असेल. ते माझे काका आहेत. तेदेखील त्यांच्यासोबत राहत होते. म्हणजे सुरुवातीपासून राहत होते. आताच त्यांचं निधन झालं.
डॉ. लांबे : माझे सासरे संपूर्ण कोकण बेल्ट सांभाळतात, ब्लॅक बेल्ट होते आणि संपूर्ण तेच पाहायचे.
अर्शद खान : अच्छा. बॉम्बेमध्ये माझे काका होते आणि तेच सर्व पाहायचे. तेव्हा मी मदनपुरात होतो. भेंडी बाजार येथे माझा जन्म झाला.
डॉ. लांबे : अर्शद मी तर म्हणतो की, तू आताच वक्फमध्ये काम सुरू कर. सध्या आपल्याकडे पावर आहे. आता हवे तितके पैसे कमवू शकतो. पूर्ण वक्फमध्ये काम सुरू कर. कमवण्याचं सेटिंग कर..अर्धे पैसे तूझे अर्धे माझे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष यांना पेन ड्राईव्ह दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांना पुन्हा एकदा निशाण्यावर धरलं आहे. अद्याप राज्य सरकारमधून कोणीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Nawab malik