मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जवाहर नगर, पटेल नगर वार्डात मागच्या वेळी भाजपचा मोठ्या फरकाने विजय; यावेळी सत्ता समीकरणं बदलणार का?

BMC Election 2022 : जवाहर नगर, पटेल नगर वार्डात मागच्या वेळी भाजपचा मोठ्या फरकाने विजय; यावेळी सत्ता समीकरणं बदलणार का?

वार्ड क्रमांक 97मध्ये जवाहर नगर आणि पटेल नगरपासून अनेक महत्वाच्या परिसरांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 97मध्ये जवाहर नगर आणि पटेल नगरपासून अनेक महत्वाच्या परिसरांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 97मध्ये जवाहर नगर आणि पटेल नगरपासून अनेक महत्वाच्या परिसरांचा समावेश होतो.

    मुंबई, 9 ऑगस्ट : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 97चा (Ward no. 97) विचार केला तर याठिकाणी भाजपची (Bjp) सत्ता आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजप उमेदवार हेतल गाला या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 97 बाबत. वार्ड क्रमांक 97मध्ये जवाहर नगर आणि पटेल नगरपासून अनेक महत्वाच्या परिसरांचा समावेश होतो. लक्षवेधी वार्ड अशी सांताक्रूधमधील वार्ड क्रमांक 97ची ओळख आहे. मागच्या वेळी याठिकाणी भाजप उमेदवार हेतल गाला यांनी मोठ्ठा विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेना उमेदवार, काँग्रेस उमदेवार आणि मनसे उमेदवार यांचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर एकूण 17 जणांनी वार्ड क्रमांक 97मधून निवडणूक लढवली होती. 2017च्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आणि पक्ष हेतल गाला, भाजप सुनिल मोरे, शिवसेना अर्जुन सिंह, काँग्रेस विजय काते, मनसे 2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 97मध्ये भाजप उमेदवाराचा मोठा विजय झाला होता. भाजपच्या हेतल गाला यांना 9 हजार मतांपेक्षाही जास्त मते मिळाली होती. तर शिवसेनेला फक्त 4 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. तसेच काँग्रेस उमेदवारालाही याठिकाणी 4 हजार मतांपेक्षा कमी मते मिळाली होती. भाजपचा या निवडणुकीत एकतर्फी विजय झाला होता. भाजप नगरसेवक यांनी आपल्या वार्डातील नागरिकांशी सतत संपर्क ठेवला आहे. तसेच कोरोना काळातही त्यांनी केलेल्या उपाययोजनांचा त्यांना यावेळी फायदा होण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने मिनी फायर स्टेशन सुरू केले. त्यासाठी नगरसेविका हेतला गाला यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्याचाही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतराचा मुंबई मनपा निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या