मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी विले पार्ले पू्र्व वार्डात भाजपची बाजी, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : मागच्या वेळी विले पार्ले पू्र्व वार्डात भाजपची बाजी, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

वार्ड क्रमांक 84 हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या वार्डमध्ये विले पार्ले (ईस्ट), सहर रोड, कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगर या भागांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
रमुंबई, 27 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 84 (Ward no. 84 BMC) विले पार्ले पूर्वचा विचार केला तर, याठिकाणी 2017मध्ये याठिकाणी भाजपचे उमेदवार (Bjp Candidate) अभिजीत सावंत जिंकले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने विशेष आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 84 बद्दल. वार्ड क्रमांक 84 हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या वार्डमध्ये विले पार्ले (ईस्ट), सहर रोड, कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगर या भागांचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपची जादू चालली होती. भाजप उमेदवार अभिजीत सावंत हे विजयी झाले होते. त्यांना 13499 इतकी मते मिळाली होती. वॉर्ड क्रमांक 84ची लोकसंख्या 55236 इतकी होती. त्यात अनुसूचित जातीचे 3364, तर अनुसूचित जमातीचे 414 नागरिक होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. अभिजीत सावंत, भाजप - 13499
  2. विणा भागवत, शिवसेना - 8871
  3. संदीप दळवी, मनसे - 7375
  4. प्यारेलाल तेली, काँग्रेस - 2031
  5. राज चौघुळे, अपक्ष - 292
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागच्या वेळी प्रत्येक प्रमुख पक्ष हा स्वतंत्र लढला होता. त्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. यावेळी जनता कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालते, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
First published:

Tags: BJP, BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या