मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मागच्या वेळी आगरकर चौकात भाजपची बाजी; यावेळची समीकरणं बदलली?

BMC Election 2022 : मागच्या वेळी आगरकर चौकात भाजपची बाजी; यावेळची समीकरणं बदलली?

वार्ड क्रमांक 80 मध्ये 2017च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार सुनील लालनप्रसाद यादव निवडून आले होते.

वार्ड क्रमांक 80 मध्ये 2017च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार सुनील लालनप्रसाद यादव निवडून आले होते.

वार्ड क्रमांक 80 मध्ये 2017च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार सुनील लालनप्रसाद यादव निवडून आले होते.

 • Published by:  News18 Desk
मुंबई, 7 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 80 आगरकर चौकबाबत (Ward no. 80 Agarkar chowk) विचार केला तर याठिकाणी भाजप उमेदवार (Bjp Candidate) जिंकून आला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 80 बद्दल. वार्ड क्रमांक 80 मध्ये 2017च्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार सुनील लालनप्रसाद यादव निवडून आले होते. त्यांना 12342 मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उमदेवाराचा नंबर होता. शिवसेना उमेदवार मनोहर गंगाराम पांचाळ यांना 10335 मते मिळाली होती. मागच्या वेळेस या वार्ड क्रमांक 80मधून एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. आकडेवारीचा विचार केला तर विजयी पक्ष भाजप आणि पराभूत पक्ष शिवसेना या दोन प्रमुख विरोधा पक्षांच्या उमेदवारांनी 10 हजार मतांचा टप्पा पार केला होता. वार्ड क्रमांक 80 आगरकर चौकमध्ये वेस्टर्न रेल्वे लाइन्स, न्यू नागरदास रोड (सब-वे), सर मथुरदास वासनजी रोड (अंधेरी-कुर्ला रोड), एस. आर. राधाकृष्णन रोड, स्वामी नित्यानंद रोड (सहार रोड) हा परिसर येतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी 47856 मतदार होते. त्यापैकी 27861मते वैध होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी 47856 मतदार होते. त्यापैकी 27861मते वैध होती. चार अपक्ष उमेदवारांपैकी सर्वात कमी मते ही 28 तर सर्वात जास्त मते ही 354 होती. 2017मधील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
 1. सुनील लालनप्रसाद यादव, भाजप - 12,342
 2. मनोहर गंगाराम पांचाळ, शिवसेना - 10335
 3. मुकेश चंद्रनाथ शर्मा, काँग्रेस - 1810
 4. विशाल विश्वनाथ हळदणकर, मनसे - 1201
 5. मनीष डायाभाई पटेल, बसपा - 723
 6. अजय जयंतीलाल सोळंकी, अपक्ष - 354
 7. बबन रामचंद्र मदने, राष्ट्रवादी - 163
 8. आबा पांडुरंग परब, जनता दल सेक्यूलर - 88
 9. साधू प्रभाकर तारापदा, अपक्ष - 28
 10. डॉ. दिनेश राणाप्रताप सिंह, अपक्ष - 41
 11. राजेंद्र शांतीलाल तावडे, अपक्ष - 66
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळचा विचार तर केला तर या वार्डात भाजप नगसेवक सुनील लालनप्रसाद यादव यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली तर मागील पाच वर्षांत त्यांची कामगिरी कशी राहिली यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
First published:

Tags: BJP, BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या