मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : श्याम नगर, पूनम नगर वार्ड क्रमांक 76मध्ये यावेळी काय होणार? जाणून घ्या, येथील परिस्थिती...

BMC Election 2022 : श्याम नगर, पूनम नगर वार्ड क्रमांक 76मध्ये यावेळी काय होणार? जाणून घ्या, येथील परिस्थिती...

नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 76 मध्ये श्यामनगर, पूनम नगर, एम एम आर डी कॉलनी, सारीपतू नगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 76 मध्ये श्यामनगर, पूनम नगर, एम एम आर डी कॉलनी, सारीपतू नगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 76 मध्ये श्यामनगर, पूनम नगर, एम एम आर डी कॉलनी, सारीपतू नगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 76मध्ये (Ward no. 76) मागच्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. भाजपच्या केशरबेन पटेल याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 76बाबत. नव्या प्रभागरचनेनुसार मुंबईतील वॉर्ड 76 मध्ये श्यामनगर, पूनम नगर, एम एम आर डी कॉलनी, सारीपतू नगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. वार्ड क्रमांक 76मध्ये भाजपच्या केशरबेन पटेल या विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सत्यवान मनचेकर आणि काँग्रेसचे नितीन सलागरे तर मनसेचे देवजी बाणे यांचा पराभव केला होता. मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात भाजपने बाजी मारली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले.
जिंकूनही पद मिळाले नाही - 
2017ला भाजपच्या उमेदवार केशरबेन मुरजी पटेल यांचा वार्ड क्रमांक 76मध्ये दणदणीत विजय झाला होता. मात्र, तरीसुद्धा त्यांना नगरसेवक पद केवळ 6 महिने उपभोगता आले. कॉंग्रेसचे उमेदवार यांनी विद्यमान नगरसेवक यांचे जात प्रमाणपत्र वैध नाही अशी तक्रार केली. तसेच न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने भाजपच्या केशरबेन मुरजी पटेल यांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा निकाल दिला. त्यामुळे सर्वाधिक मते घेऊनही काकी यांना बाजूला बसावे लागले तर कॉंग्रेसचे नितीन सलांग्रे हे नगरसेवक पदी विराजमान झाले.
राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर वार्ड क्रमांक 76चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या