मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : जुहू तारा, कुपर रुग्णालय वार्डात जनता पुन्हा भाजपला साथ देणार का? काय असणार येथील सत्तेचं गणित?

BMC Election 2022 : जुहू तारा, कुपर रुग्णालय वार्डात जनता पुन्हा भाजपला साथ देणार का? काय असणार येथील सत्तेचं गणित?

नव्या प्रभागरचनेनुसार वार्ड क्रमांक 71मध्ये जुहू तारा , कुपर रुग्णालय, अशोक नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

नव्या प्रभागरचनेनुसार वार्ड क्रमांक 71मध्ये जुहू तारा , कुपर रुग्णालय, अशोक नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

नव्या प्रभागरचनेनुसार वार्ड क्रमांक 71मध्ये जुहू तारा , कुपर रुग्णालय, अशोक नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 71मध्ये (Ward no. 71 BMC) मागच्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. भाजपचे अनिष नवल मकवानी याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 71बाबत. नव्या प्रभागरचनेनुसार वार्ड क्रमांक 71मध्ये जुहू तारा , कुपर रुग्णालय, अशोक नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 71मध्ये भाजपचे उमेदवार अनिष नवल मकवानी हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार जितेंद्र जानावळे आणि काँग्रेसचे जयंतीलाल सिरोया यांचा पराभव केला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणून वार्ड क्रमांक 71चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या