मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : सात बंगला, मॉडेल टाऊन वॉर्डात यावेळीही भाजपचं वर्चस्व दिसणार की सत्ताबदल होणार?

BMC Election 2022 : सात बंगला, मॉडेल टाऊन वॉर्डात यावेळीही भाजपचं वर्चस्व दिसणार की सत्ताबदल होणार?

वार्ड क्रमांक 70मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो.

वार्ड क्रमांक 70मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो.

वार्ड क्रमांक 70मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 27 जुलै : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 70 बाबत (Ward no. 70) बोलायचे झाले तर याठिकाणी मागच्या वेळी भाजप उमेदवार (Bjp Candidate) निवडून आला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक, 70 बद्दल. भाजपची बाजी -  वार्ड क्रमांक 70मध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो. 2017च्या मनपा निवडणुकीत या वार्डात एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, युनायटेड काँग्रस पार्टी अशा सहा पक्षांनी तर तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यात भाजप उमेदवार सुनिता राजेश मेहता यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांना 13034 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या विणा टॉक यांना 3760 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार बिनिता मेहुल वोरा या होत्या. त्यांना 3478 मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
  1. सुनिता मेहता, भाजप - 13034
  2. विणा टॉक, शिवसेना - 3760
  3. बिनिता मेहुल वोरा, काँग्रेस - 3478
  4. स्मिता परेरा, राष्ट्रवादी काँग्रेस - 158
  5. रश्मी रविंद्र येलंगे, मनसे - 2076
  6. संध्या सूर्यकांत सावंत, युनायटेड काँग्रेस पार्टी - 88 यासोबतच तीन अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात होते.
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका वार्ड क्रमांक 70मधील मतदारांची संख्या पाहिली तर याठिकाणी एकूण 42200 मतदार आहेत. त्यापैकी 22784 वैध मतदान झाले. या वार्डमध्ये सात बंगला, मॉडेल टाऊन, मोरा गाव आणि भारत नगर या भागांचा प्रामुख्याने समावेश होतो. तर मतदानाची आकडेवारी पाहिली तर भाजपचे याठिकाणी वर्चस्व दिसून येते. एकूण मतदानाच्या 50 टक्के मतदान हे भाजपला झाले आहे. दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या