मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : अंबोली, गावदेवी वार्डात जनतेची मागच्या वेळी भाजपला साथ, यावेळी समीकरणं बदलणार का?

BMC Election 2022 : अंबोली, गावदेवी वार्डात जनतेची मागच्या वेळी भाजपला साथ, यावेळी समीकरणं बदलणार का?

वार्ड क्रमांक 67मध्ये अंबोली, गावदेवी, नवरंग सिनेमा, डीएन नगर, भवन्स कॉलेज या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 67मध्ये अंबोली, गावदेवी, नवरंग सिनेमा, डीएन नगर, भवन्स कॉलेज या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 67मध्ये अंबोली, गावदेवी, नवरंग सिनेमा, डीएन नगर, भवन्स कॉलेज या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 67 बाबत (Ward n0. 67) विचार केला तर याठिकाणी भाजपने (Bjp) बाजी मारली होती. भाजपच्या सुधा शंभूनाथ सिंह याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला आहे. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 67 बाबत. वार्ड क्रमांक 67मध्ये अंबोली, गावदेवी, नवरंग सिनेमा, डीएन नगर, भवन्स कॉलेज या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. 2017च्या मनपा निवडणुकीत याठिकाणी भाजपच्या सुधा शंभूनाथ सिंह या विजयी झाल्या होत्या. त्यांना याठिकाणी 10719 इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना हा पक्ष होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - सुधा सिंह, भाजप - 10719 प्राची परब, शिवसेना - 7587 वनिता मारुचा, काँग्रेस - 4243 राधिका उडियार, मनसे - 968 मागच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सुधा सिंह यांनी 3132 मताधिक्य मिळवून दणदणीत विजय मिळवला होता. वॉर्ड क्र. 67 ही सर्वसाधारण महिला आरक्षित ठेवण्यात आला आहे. वॉर्ड क्र. 67 मध्ये एकूण 52571 मतदार होते. त्यापैकी 23517 मते वैध होती. वॉर्ड क्रमांक 150 ची एकूण लोकसंख्या 50391 इतकी आहे. यात अनुसूचित जातीचे 7616 आणि अनुसूचित जमातीचे 335 नागरिक आहेत. मागच्या निवडणुकीत एकूण 18669 वैध मतांची नोंद झाली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.  तसेच मागील पाच वर्षात भाजप नगरसेविकेने कोणती कामे केलीत, जनतेशी कसा संपर्क ठेवला, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या