मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मालाड पूर्व वार्ड क्रमांक 44मधील जनता पुन्हा भाजपला साथ देणार की समीकरणं बदलणार?

BMC Election 2022 : मालाड पूर्व वार्ड क्रमांक 44मधील जनता पुन्हा भाजपला साथ देणार की समीकरणं बदलणार?

मुंबईतील वार्ड क्रमांक 44मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मुंबईतील वार्ड क्रमांक 44मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मुंबईतील वार्ड क्रमांक 44मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 44 पूर्व मालाडमध्ये (Ward no. 44 East Malad) मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाने (Bjp) बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपच्या उमेदवार संगिता ज्ञानमूर्ती शर्मा या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमाक 44 बाबत. मुंबईतील वार्ड क्रमांक 44मध्ये मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात भाजपने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या उमेदवार संगिता ज्ञानमूर्ती शर्मा याठिकाणी विजयी झाल्या होत्या. त्यांना 9955 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - संगिता ज्ञानमूर्ती शर्मा, भाजप - 9955 धानुका रंजना सुभाष, शिवसेना - 5550 फडीया सुरेखा दिपक, अपक्ष - 53 नसरीन फहीम खान, ऑल इंडिया मजलिस इनेहदूल मुस्लिमीन - 2903 माने जानवी विपुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 574 रुखसाना मेमन, समाजवादी पक्ष - 513 सिंग दीपा राणासंग्राम, काँग्रेस - 999 रेखा संजय सोनावणे, मनसे - 408 मनिया सतीश वार्डे, बहुजन समाज पक्ष - 1888 2017च्या निवडणुकीची आकडेवारी जर पाहिली तर भाजप आणि शिवसेनेत प्रमुख लढाई पाहायला मिळाली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वार्ड क्रमांक 44 चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या