Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : पठाण वाडी, कोकणी पाडा वार्डात जनता यावेळीही भाजपला साथ देणार का? काय असणार निवडणुकीचं गणित?

BMC Election 2022 : पठाण वाडी, कोकणी पाडा वार्डात जनता यावेळीही भाजपला साथ देणार का? काय असणार निवडणुकीचं गणित?

वार्ड क्र. 43 मध्ये या वार्डात पठाण वाडी, शांताराम तलाव, त्रिवेणी नगर, कोकणी पाडा हा भाग येथे. याठिकाणी मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती.

    मुंबई, 5 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.  मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वार्ड क्रमांक 43 मध्ये (Ward no. 43) भाजपने बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी वार्ड क्रमांक 43 मधून भाजपचे विनोद मिश्रा हे (Bjp Candidate) विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 136 बाबत. वार्ड क्र. 43 मध्ये या वार्डात पठाण वाडी, शांताराम तलाव, त्रिवेणी नगर, कोकणी पाडा हा भाग येथे. याठिकाणी मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार विनोद मिश्रा यांना 2017च्या मनपा निवडणुकीत वार्ड क्रमांक 43 मध्ये यांना 5620 इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष होता. मागच्या वेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात भाजपने विजय मिळवला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. विनोद उदयनारायण मिश्रा, भाजप - 5620
    2. अजित बाळकृष्ण रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 4782
    3. भोमसिंग हिरसिंग राठोड, शिवसेना - 4911
    4. सिताराम जाधव, मनसे - 746,
    5. जाधव प्रमोद रघुनाथ, अपक्ष - 323,
    6. अजित रावराणे, काँग्रेस - 4782
    7. कॉ. जमुना प्रसाद विश्वनाथ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) - 120
    8. काकडे तानाजी त्रिंबक, अपक्ष - 27
    9. खान नाझीम युसूफ, अपक्ष - 32
    10. राशेख आजाद अहमद हविव, अपक्ष - 39
    हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 43चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या