Home /News /maharashtra /

BMC Election 2022 : तानाजी नगर वार्डात यावेळीही भाजप बाजी मारणार का?, काय असणार सत्तेची गणितं?

BMC Election 2022 : तानाजी नगर वार्डात यावेळीही भाजप बाजी मारणार का?, काय असणार सत्तेची गणितं?

वार्ड क्र. 37मध्ये तानाजी नगर, कुरार गाव, सेंट जोसेफ हायस्कूल या प्रमुख भागांचा समावेश होतो.

    मुंबई, 5 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे.  मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वार्ड क्रमांक 37मध्ये भाजपने बाजी मारली होती. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी वार्ड क्रमांक 37मधून भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 37बाबत. वार्ड क्र. 37मध्ये तानाजी नगर, कुरार गाव, सेंट जोसेफ हायस्कूल या प्रमुख भागांचा समावेश होतो. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार प्रतिभा हेमंत शिंदे या निवडून आल्या होत्या. त्यांना 7815 इतकी मते मिळाली होती. मतांची आकडेवारी पाहिली तर शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
    1. प्रतिभा हेमंत शिंदे, भाजप - 7815
    2. पुजा रणवीरसिंग चौहान, शिवसेना - 6363
    3. रुपाली अजित रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 4624
    4. जयश्री चंद्रकांत ठसाळे, मनसे - 2123
    5. अनुसया पवार (पवारलाई), काँग्रेस - 1444
    6. आरती आनंद जाधव, अपक्ष - 46
    7. मयुरी उत्तम नाडकर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) - 232
    8. अॅड. नंदा कमलदीप सिंग, यूनाइटेड काँग्रेस पक्ष - 62
    2017च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 37 हा महिलांसाठी राखीव होता. एकूण 8 उमेदवार त्यावेळी याठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात भाजपने बाजी मारली होती. एकूण 23035 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अत्यंत चुरशीचा सामना त्यावेळी पाहायला मिळाला होता. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी, असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 37चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या