मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : कमलानगर, शंकर लेन वार्डात 2017ला भाजप विजयी, यावेळी काय असणार परिस्थिती?

BMC Election 2022 : कमलानगर, शंकर लेन वार्डात 2017ला भाजप विजयी, यावेळी काय असणार परिस्थिती?

वार्ड क्रमांक 31मध्ये मालाडमधील कमलानगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 31मध्ये मालाडमधील कमलानगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 31मध्ये मालाडमधील कमलानगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

    मुंबई, 3 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 31मध्ये (Ward no. 31) मागच्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. भाजपचे कमलेश यादव याठिकाणी विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 31बाबत. वार्ड क्रमांक 31मध्ये मालाडमधील कमलानगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 31 मध्ये भाजपचे कमलेश यादव (Kamlesh Yadav) यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत कमलेश यादव यांना 7826 इतकी मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. गीता आशिष यादव यांचा पराभव केला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे - कमलेश यादव, भाजप - 7826 डॉ. गीता आशिष यादव, काँग्रेस - 3937 दिनेश साळवी, मनसे - 3163 याबरोबरच समाजवादी पार्टीचे कैलास यादव यांना अडीच हजारांवर मतदारांनी पसंती दिली होती. वार्ड क्रमांक 31मध्ये अमराठी लोकही बऱ्याच प्रमाणात राहतात. या वार्डात रस्त्यांचा प्रश्न अजूनही आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, जागोजागी फेकला जाणारा कचरा अशी येथील अवस्था आहे. त्यामुळे मतदार यावेळी या बाबींचा नक्कीच विचार करण्याची शक्यता आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत वार्ड क्रमांक 108 चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या