मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : शंकरवाडी वार्डात मागच्या वेळी भाजपचे वर्चस्व, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : शंकरवाडी वार्डात मागच्या वेळी भाजपचे वर्चस्व, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 30 मध्ये शंकरवाडी, अशोक नगर, पद्मबा नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 30 मध्ये शंकरवाडी, अशोक नगर, पद्मबा नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 30 मध्ये शंकरवाडी, अशोक नगर, पद्मबा नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.

    मुंबई, 29 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 30 (Ward no. 30 Shankarwadi) बाबत विचार केला तर याठिकाणी 2017च्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) वर्चस्व याठिकाणी दिसून आले होते. भाजपच्या लीना पटेल देहेरकर यांचा या निवडणुकीत विजय झाला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 30 बाबत. वार्ड क्रमांक 30 मध्ये शंकरवाडी, अशोक नगर, पद्मबा नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. महानगरपालिका प्रशासनाने काढलेल्या आरक्षण सोडतीत हा वार्ड खुला ठेवण्यात आला आहे. या वार्डातील एकूण लोकसंख्या 47354 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची 1694, तर अनुसूचित जमातीचे 699 नागरिक आहेत. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
    1. लिना पटेल देहेरकर, भाजप - 18333
    2. नम्रता निकुंज रुघाणी, शिवसेना - 3459
    3. निर्मला बृजमोहन कनौजिया, काँग्रेस - 1511
    4. मीनल जितेंद्र द्विवेदी, मनसे - 834
    5. मिना जितेंद्र गोहिल, अपक्ष - 63
    6. नोटा - 990
    हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगर पालिकेला देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. मागच्या वेळी वार्ड क्रमांक 30 भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसली. मात्र, भाजप उमदेवाराने एकहाती विजय मिळवला. दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात भाजप नगरसेवकाने काय कामे केलीत, यावरही लक्ष राहणार आहे. वार्ड क्रमांक 30 मधील नागरिक भाजपला पुन्हा संधी देतात की, आणखी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतात, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या