मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : आकुर्ली नगर, विश्वकर्मा मंदिर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी विरोधी पक्षाची जादू चालणार का?

BMC Election 2022 : आकुर्ली नगर, विश्वकर्मा मंदिर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी विरोधी पक्षाची जादू चालणार का?

आरक्षण सोडतीत हा वार्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.

आरक्षण सोडतीत हा वार्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.

आरक्षण सोडतीत हा वार्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 8 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईतील आकुर्ली नगर वार्ड क्रमांक 29चा (Aakurli Nagar Ward no. 29) विचार केला तर याठिकाणी भाजपची (Bjp) सत्ता आहे. भाजप उमेदवार सागर रमेशसिंग ठाकूर यांनी याठिकाणी बाजी मारली होती. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 29 बद्दल. वार्ड क्रमांक 29 आकुर्ली नगर यामध्ये विश्वकर्मा मंदिर, मायाक्का देवी मंदिर, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह, फिश मार्केट, हनुमान नगर, वडार पाडा, साई समाधान हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर येतो. लोकसंख्येचा विचार तर केला येथील लोकसंख्या ही 52473 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची 1759, तर अनुसूचित जमातीची 636 इतकी लोकसंख्या आहे. आरक्षण सोडतीत हा वार्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक सागर ठाकूर यांची अडचण झाली आहे. त्यांना निवडणुकीसाठी दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. 2017मध्ये विद्यमान नगरसेवक सागर ठाकूर यांना 8043 मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. ठाकूर सागर रमेश सिंह – भाजप – 8043
  2. सचिन पाटील – शिवसेना – 5231
  3. रामअशीश गुप्ता – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 3956
  4. मुकेश बसंतीलाल पामेचा – अपक्ष – 1977
  5. सतीश मनोहर देसाई – अपक्ष – 934
  6. गुंजे सुशील प्रकाश – मनसे – 538
  7. किरण पुरुषोत्तम मोरे – एनसीपी – 90
  8. कुराडे लक्ष्मण यलप्पा – बहुजन विकास आघाडी – 18
  9. नोटा – 273
हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. वार्ड क्रमांक 29मध्ये यावेळी मतदार राजा कुणाच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या