मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : नरीमन पॉईंट वार्डात 2017मध्ये भाजप विजयी, यावेळी समीकरणं बदलणार का?

BMC Election 2022 : नरीमन पॉईंट वार्डात 2017मध्ये भाजप विजयी, यावेळी समीकरणं बदलणार का?

वार्ड क्रमांक 226 नरीमन पॉईंट येथे मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती.

वार्ड क्रमांक 226 नरीमन पॉईंट येथे मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती.

वार्ड क्रमांक 226 नरीमन पॉईंट येथे मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती.

    मुंबई, 10 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 226 मध्ये (Ward no. 226) मागच्या वेळी भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. 2017 च्या निवडणुकीत याठिकाणी भाजप उमेदवार हर्षिता नार्वेकर या विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 226 बाबत. वार्ड क्रमांक 226 नरीमन पॉईंट येथे मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती. त्याठिकाणी भाजप उमेदवार हर्षिता नार्वेकर या निवडून आल्या होत्या. त्यांना तब्बल 11053 इतकी मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना हा पक्ष होता. मात्र, शिवसेना आणि भाजप उमदेवाराच्या मतांच्या आकडेवारीमध्ये फारच अंतर होते. 2017च्या निवडणुकीतील उमदेवार, पक्ष आणि मिळालेली मते - हर्षिता नार्वेकर, भाजप - 11,053 स्मिता पवळे, शिवसेना - 6852 सुषमा विनोद शेखर, कॉंग्रेस - 3161 सिंग रेखा आशिष, समाजवादी पार्टी - 1287 शोभा रामू राठोड, अपक्ष - 147 सय्यद शिरिन नदीम, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 276 सुजाता अनिल शाह, अपक्ष - 112 शेख रिहानबेगम, बहुजन समाज पार्टी - 132 भारती चव्हाण, अपक्ष - 122 निलिमा वासुदेव, तांडेल मनसे - 969 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या वार्डात राज्यातील सत्तांतराचा काय परिणाम होतो आणि जनता कुणाच्या पारड्यात मते टाकते, हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या