मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : धोबी तलाव वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : धोबी तलाव वार्डात भाजपचं वर्चस्व, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती.

2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती.

2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती.

    मुंबई, 29 जुलै : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 222चा (Ward no. 222 Dhobi Talav) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी भाजपच्या (BJP) उमेदवार रीटा मकवाना निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 222 बाबत. वार्ड क्रमांक 222 मध्ये धोबी तलाव, सोनापूर, चंदन वाडी जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊल वाडी या प्रमुख भागांचा समावेश होतो. मागच्या निवडणुकीत याठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून आले होते. त्यावेळी याठिकाणी भाजप उमेदवार रीटा मकवाना निवडून आल्या होत्या. त्यांना 10365 मते मिळाली होती. रीटा मकवाना यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उमेदवाराचा पराभव केला होता. शिवसेना उमेदवार मीना कांबळी यांना 8362 इतकी मते मिळाली होती. या वार्डातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला नव्हता. 2017 साली झालेल्या निवडणुकीत या वार्डात एकूण 25058 इतके मतदान झाले होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
    1. रीटा मकवाना, भाजप - 10365
    2. मीना कांबळी, शिवसेना - 8362
    3. विनिती खेडेकर, काँग्रेस - 3231
    4. प्रिती पटेल, मनसे - 1998
    5. नोटा - 652
    2017च्या निवडणुकीत या वार्डात शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. त्यात, भाजपने बाजी मारली, असे आकडेवारीवरुन दिसून येते. यावेळी राज्यातील समीकरणे वेगळी आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील पाच वर्षात भाजप नगरसेवकाने केलेली कामे, आणि जनसंपर्क यावरही लक्ष राहणार आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 222 मधील जनता पुन्हा भाजपला संधी देते की अन्य पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालते, हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या