मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : मलबार हिल वार्डात मागच्या वेळी भाजपचा मोठा विजय, यावेळची समीकरणं काय असणार?

BMC Election 2022 : मलबार हिल वार्डात मागच्या वेळी भाजपचा मोठा विजय, यावेळची समीकरणं काय असणार?

वार्ड क्रमांक 219मध्ये राजभवन, तीन बत्ती, मलबार हिल, कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन, सिमला नगर, हैदराबाद इस्टेट आदी भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 219मध्ये राजभवन, तीन बत्ती, मलबार हिल, कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन, सिमला नगर, हैदराबाद इस्टेट आदी भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 219मध्ये राजभवन, तीन बत्ती, मलबार हिल, कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन, सिमला नगर, हैदराबाद इस्टेट आदी भागांचा समावेश आहे.

    मुंबई, 8 ऑगस्ट : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राजकीय पक्षांनीही या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 219चा (Ward no. 219) विचार केला तर याठिकाणी भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसून आले होते. याठिकाणी भाजप उमेदवार ज्योत्सना मेहता विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 219 बाबत. वार्ड क्रमांक 219मध्ये राजभवन, तीन बत्ती, मलबार हिल, कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन, सिमला नगर, हैदराबाद इस्टेट आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड सर्वांसाठी खुला आहे. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजप उमेदवार ज्योत्सना मेहता या याठिकाणी निवडून आल्या होत्या. त्यांना या निवडणुकीत 15361 मते मिळाली होती. याठिकाणी भाजपचा फार मोठ्या फरकाने विजय झाला होता. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - ज्योत्सना देवेश मेहता, भाजप - 15361 कांबळे पारुल राजेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 111 मांद्रेकर प्रीती प्रमोद, काँग्रेस - 5456 शिंदे दुर्गा किरण, शिवसेना - 4095 वैध मते - 25569 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या वार्डात आता जनता भाजपलाच पुन्हा संधी देते की यावेळी दुसऱ्या अन्य पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालते, हे तर आगामी काळात निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या