मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : माझगाव कोर्ट, ताडवाडी वार्ड क्र. 218मध्ये मागच्या वेळी भाजप विजयी, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : माझगाव कोर्ट, ताडवाडी वार्ड क्र. 218मध्ये मागच्या वेळी भाजप विजयी, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 218मध्ये माझगाव कोर्ट, ताडवाडी, मसीना हॉस्पीटल, वीर जिजामाता उद्यान, माझगाव टेलिफोन एक्सचेंज, महाराणा प्रताप चौक या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

    मुंबई, 3 ऑगस्ट : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वार्ड क्रमांक 218मध्ये (Ward no. 2018) मागच्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) वर्चस्व दिसले होते. भाजपच्या अनुराधा पोतदार याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 218बाबत. वार्ड क्रमांक 218मध्ये माझगाव कोर्ट, ताडवाडी, मसीना हॉस्पीटल, वीर जिजामाता उद्यान, माझगाव टेलिफोन एक्सचेंज, महाराणा प्रताप चौक या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 218 मध्ये भाजपच्या अनुराधा पोतदार या विजयी झाल्या होत्या. अनुराधा पोतदार यांच्याविरोधात याठिकाणी काँग्रेसच्या वैशाली तुपट या रिंगणात होत्या. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 227 वार्ड होते. नव्या रचनेनुसार यंदा 236 वार्ड करण्यात आले. मुंबई शहरात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ वार्ड वाढवण्यात आले. मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. त्यामुळे येथील निवडणुकीवर सर्वांचे लक्ष असते. सध्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत वार्ड क्रमांक 218 मध्ये येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Election, Mumbai

    पुढील बातम्या