मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : असरा कॉलनी, जया नगर वार्डात भाजपचे वर्चस्व; यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : असरा कॉलनी, जया नगर वार्डात भाजपचे वर्चस्व; यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 16मध्ये असरा कॉलनी, जया नगर, सुमेर नगर, असरा कॉलनी, एस.व्ही रोड या भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 16मध्ये असरा कॉलनी, जया नगर, सुमेर नगर, असरा कॉलनी, एस.व्ही रोड या भागांचा समावेश आहे.

वार्ड क्रमांक 16मध्ये असरा कॉलनी, जया नगर, सुमेर नगर, असरा कॉलनी, एस.व्ही रोड या भागांचा समावेश आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑगस्ट : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आगामी काळात लवकरच होणार आहे. (BMC Election 2022) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक 16 चा (Ward no. 16 BMC) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. 2017च्या मनपा निवडणुकीत याठिकाणी भाजप उमेदवार अंजली खेडकर या निवडून आल्या होत्या. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 16 बाबत. वार्ड क्रमांक 16मध्ये असरा कॉलनी, जया नगर, सुमेर नगर, एस.व्ही रोड या भागांचा समावेश आहे. यावेळच्या आरक्षण सोडतीत हा वार्ड खुला आहे. त्यामुळे याठिकाणी पुरुषांनाही निवडणूक लढायची संधी मिळणार आहे. मागच्या वेळी याठिकाणी भाजप उमेदवार अंजली खेडकर या निवडून आल्या होत्या. त्यांना 9465 इतकी मते मिळाली होती. 2017च्या मनपा निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते - अंजली खेडेकर, भाजप - 9465 प्रिती दांडेकर, शिवसेना - 7554 विजयालक्ष्मी शेट्टी, काँग्रेस - 6676 मनिषा नवनाथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 1852 रेश्मा निवळे, मनसे - 1724 पूनम नितेश इजगज, बसपा - 632 नोटा - 515 आकडेवारी जर पाहिली तर शिवसेनेच्या प्रिती दांडेकर यांनी भाजपच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र, त्या अगदी कमी मतांनी पराभूत झाल्या. वॉर्ड क्रमांक 16ची एकूण लोकसंख्या 49002 इतकी आहे. त्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 417 आहे. वार्ड क्रमांक 16मधील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, दुसऱ्या पक्षातील उमेदवाराच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ घालते, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर - दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकंदरीतच यावेळची निवडणूक ही रंजक होणार आहे.
First published:

Tags: BJP, BMC, Election, Mumbai, Shivsena

पुढील बातम्या