मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी काय होणार?

BMC Election 2022 : हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर वार्डात भाजपचे वर्चस्व, यावेळी काय होणार?

वार्ड क्रमांक 122 मध्ये हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारखा हायप्रोफाईल भाग तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 122 मध्ये हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारखा हायप्रोफाईल भाग तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या भागांचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 122 मध्ये हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारखा हायप्रोफाईल भाग तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या भागांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 122चा (Ward no. 122) विचार केला तर याठिकाणी मागच्या वेळी भाजपने (Bjp) बाजी मारली होती. भाजपच्या उमेदवार वैशाली श्रीकांत पाटील याठिकाणी विजयी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 122 बाबत. वार्ड क्रमांक 122 मध्ये हिरानंदानी गार्डन, पंचकुटीर यांसारखा हायप्रोफाईल भाग तसेच साईनाथ नगर, गणेश नगर, म्हाडा कॉलनी, जलवायू विहार, रमाबाई आंबेडकर नगर या भागांचा समावेश होतो. मागच्या निवडणुकीत याठिकाणी भाजपने बाजी मारली होती. भाजपच्या वैशाली श्रीकांत पाटील या विजयी झाल्या होत्या. त्यांना 4942 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काट्याची लढत झाली होती. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते -
  1. वैशाली श्रीकांत पाटील, भाजप - 4942
  2. जया हनुमंता वेंकटगिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 4220
  3. स्नेहल दिपक मांडे, शिवसेना - 3749
  4. अंजली वसंत दराडे, काँग्रेस - 1552
  5. सुजाता अश्विन चव्हाण, मनसे - 318
याबरोबरच या निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीला 359 मते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (मार्क्सवादी) 655 मते मिळाली होती. तर नोटालाही 378 मते मिळाली होती. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो तसेच वार्ड क्रमांक 122चा विचार केला तर येथील जनता पुन्हा भाजपला संधी देते की, अन्य दुसऱ्या पक्षाला, हे आगामी निवडणुकीत पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या