मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : भांडूप कॉम्पलेक्स, घाडीपाडा वार्ड भाजपचा बालेकिल्ला, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

BMC Election 2022 : भांडूप कॉम्पलेक्स, घाडीपाडा वार्ड भाजपचा बालेकिल्ला, यावेळी काय असणार सत्ता समीकरणं?

वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडूप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख भागंचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडूप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख भागंचा समावेश होतो.

वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडूप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख भागंचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 11 ऑगस्ट : खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होईल. (BMC Election 2022) दरम्यान या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. वार्ड क्रमांक 103मध्ये (Ward no. 103 Bhandup Complex) मागच्या वेळी भाजपचा (Bjp) विजय झाला होता. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक हे विजयी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय आढावा घेतला. जाणून घ्या, वार्ड क्रमाक 103 बाबत. वार्ड क्रमांक 103 मध्ये भांडूप कॉम्प्लेक्स, विहार तलाव, विणा नगर, घाटीपाडा, आदिभक्ती नगर या प्रमुख भागंचा समावेश होतो. हा वार्ड भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे याठिकाणची निवडणूक नेहमीच रंजक होते. 2017च्या निवडणुकीत याठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक हे विजयी झाले होते. त्यांना या निवडणुकीत 14063 इतकी मते मिळाली होती. शिवसेना विरुद्ध भाजप अशी ही लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे गोपीनाथ संसारे हे पराभूत झाले होते. त्यांना 6436 इतकी मते मिळाली होती. 2017च्या निवडणुकीत या वार्डातून 16 जण रिंगणात होते. 2017च्या निवडणुकीतील उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे - मनोज कोटक, भाजप - 14063 गोपीनाथ संसारे, शिवसेना - 6436 डॉ. आर. आर. सिंह, काँग्रेस - 3332 निलेश पाटील, मनसे - 653 हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका राज्यात सत्तांतर -  दरम्यान, नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सत्तांतराचा मुंबई मनपाच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या