मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वीज बिलानंतर आता PAN Card Fraud, एक चूक आणि पैसे गायब!

वीज बिलानंतर आता PAN Card Fraud, एक चूक आणि पैसे गायब!

एक छोटी चूक महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. नाहीतर एक झटक्यात तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या

एक छोटी चूक महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. नाहीतर एक झटक्यात तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या

एक छोटी चूक महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. नाहीतर एक झटक्यात तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या

  मुंबई : आपल्या ओळखपत्रातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनकार्ड आहे. ते जपून ठेवणं आणि त्याची गोपनियता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण पॅनकार्डशी आधार आणि त्यासोबत बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती देखील जोडलेली असतात. अशावेळी आपली एक चूक चांगलीच महागात पडू शकते. गेल्या काही दिवसांमध्ये हॅकर्सचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्या मार्गाने हॅकर्स फसवणूक करत आहे. एक छोटी चूक महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. नाहीतर एक झटक्यात तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ती काळजी घेणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी वीजबिलावरून फसवणूक केली जात होती. तीच पद्धत वापरून आता पॅनकार्ड हॅकिंग सुरू झालं आहे. एका महिलेला पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी सतत SMS येत होते. या महिलेनं चुकून त्याच्यावर क्लीक केलं. त्यानंतर तिला तीन OTP आले. या महिलेनं ते OTP कोणताही बाकीचा विचार न करता शेअर केला. त्यानंतर तिच्या खात्यातील पैसे निघाले. हजारो नाही तर चक्क एक लाख रुपयांचा फटका एका चुकीमुळे महिलेला बसला आहे.

  Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर…

  5 मिनिटांत 1.24 लाख रुपयांचा फटका या महिलेला बसला आहे. या महिलेनं जेव्हा SMS वर आलेल्या लिंकवर क्लीक केलं तेव्हा मिररिंग अॅप्लिकेशनचा वापर करून बँकेचे डिलेल्स मिळवले आणि या महिलेच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

  Income Protection Planने तुमच्या कुटुंबियांचा आर्थिक आधार द्या; संकटात उत्पन्नाची गॅरंटी

  तुमचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला ही चूक करायची नाही. एवढंच नाही तर आपले कोणतेही डिटेल्स, OTP किंवा ओळखपत्राशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्ती, किंवा कोणत्याही लिंकवर देऊ नका. तुमच्या फोनमध्ये देखील कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला परमिशन देताना नीट वाचून द्या. त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही फसवणूक होण्यापासून वाचू शकता.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  पुढील बातम्या