मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनसे कार्यकर्त्याचा थेट राज्यपालांना फोन, 'त्या' वक्तव्यावर विचारला जाब.. कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

मनसे कार्यकर्त्याचा थेट राज्यपालांना फोन, 'त्या' वक्तव्यावर विचारला जाब.. कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. आता या संदर्भात एका मनसे कार्यकर्त्याने थेट राज्यपालांना फोन करुन याचा जाब विचारल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

    मुंबई, 1 ऑगस्ट : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून गेल्यास मुंबईत (Mumbai City) पैसाच उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यानंतर मनसेसह सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यपालांवर टीकेची जोड उडाली होती. तर आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने त्यांनी हात वरती केले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्याच्या नावाने एक कथेत ऑडिओ क्लिप वायरल होत आहे. यामध्ये मनसे कार्यकर्ता राज्यपाल कोश्यारींना जाब विचारताना ऐकायला मिळत आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय? ऑडिओ क्लिप मध्ये राज्यपाल भगतसिंह कोशियर यांना मनसे कार्यकर्ता हा त्यांच्या या वक्तव्याबाबत जाब विचारताना ऐकायला मिळत आहे. तसेच त्यात तो त्यांना त्यांच्या वयाचा दाखलाही देतोय. तर तुमची मोदी आणि योगींकडे तक्रार करावी लागेल, तुमचे हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असेही म्हणत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वायरल होत आहे. BNM या न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेजवर ही ऑडिओ क्लिक असून त्यात या कथित क्लिपचा दावा करण्यात आला आहे. राज्यपालांचा मवाळीचा सूर या ऑडिओ क्लिपच्या शेवटी हा कार्यकर्ता राज्यपालांना तुम्ही अशी वक्तव्य करून लोकांचे विभाजन करू नका, लोकांना असं तोडू नका असे म्हणत, रागवत आहे. तर त्याच्यावरती राज्यपाल “नहीं तोडेंगे भाई. हम ही चले जायेंगे, असा मवाळकीचा सूर घेताना दिसत आहेत. तर तुमचं म्हणणं मला पटतंय. तुम्ही म्हणताय ते सर्व मला मान्य आहे असेही राज्यपाल या कार्यकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची माफी नको, आता त्यांना थेट परत पाठवा, त्यांची खूप वक्तव्य झाली, आता हे सहन केलं जाणार नाही, असा सूर राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्यावरती उमटला होता, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापताना दिसतंय. दरम्यान, ह्या कथित ऑडिओ क्लिपच्या सत्येतेबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Governor bhagat singh

    पुढील बातम्या