मुंबई 29 जुलै : मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. यामुळे शिंदे गटातील अनेक नेते संभ्रमात असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक नेते अद्याप संभ्रमात आहे. त्यामुळे १ तारखेच्या न्यायालयाच्या निकालाकडे या नेत्यांचे डोळे आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यातील कुठे आपल्याला फायदा होईल याकडे या नेत्यांचे डोळे लागले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही.
श्रीकांत शिंदे यांच्या घरी नुकतंच अर्जून खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना अर्जून खोतकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर म्हणाले, की मी जालन्यात जाऊन निर्णय जाहीर करणार आहे. जालना लोकसभा उमेदवाराबाबत चर्चा सुरू आहे आणि बोलणी करण्याचे अधिकार अब्दुल सत्त्तार यांना दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, की हे सर्व ठरलेलं आहे. मी या सर्वांना नाश्त्यासाठी बोलविले होतं आणि ते सर्व आले. अर्जुन खोतकर आमचे नेते आहेत. आम्हाला हजारो लोकांचा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान अर्जुन खोतकर गटात सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला.
'हे' सामुदायिक हत्याकांड आहे; शिवसेनेचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान खासदारांच्या निर्णयाबाबत अद्यापही स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. अद्याप मंत्रिमंडळ विस्तारही न झाल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील नेते संपर्कात असल्याचा आणि ते अस्वस्थ असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena