मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलची मोठी कारवाई; 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलची मोठी कारवाई; 50 कोटींचे ड्रग्ज जप्त

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मोठी कारवाई केली आहे. यात अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने मोठी कारवाई करत 50 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 04 ऑगस्ट : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मोठी कारवाई केली आहे. यात अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने मोठी कारवाई करत 50 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेल्या एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 50 कोटींहून अधिक आहे. या कारवाईत 5 अंमली पदार्थ तस्करांनाही अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. 42 कोटी मंजूर असून जळगाव पालिकेचे आळशीपणा, अखेर लोक झाली आत्मनिर्भर, वर्गणीतून बनवला रस्ता याआधी आठवडाभरापूर्वीच पुण्यातील विमाननगर परिसरातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 714 ग्रॅम मेफेड्रोन (M.D.) जप्त करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 1 कोटी 7 लाख इतकी होती. एनसीबीने 1 जूनपासून अमली पदार्थ निर्मूलन मोहीम सुरू केली होती आणि 29 जुलैपर्यंत 11 राज्यांमध्ये 51,217 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केल्यावर, NCB ने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्त 75,000 किलो ड्रग्ज नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलनेही ही मोठी कारवाई करत 50 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.
First published:

Tags: Drugs

पुढील बातम्या