मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : दसरा मेळावा कुणाचा ऐकणार? अजित पवार म्हणाले...

Dasara Melava : दसरा मेळावा कुणाचा ऐकणार? अजित पवार म्हणाले...

उद्धव ठाकरे माझ्या उजव्या हाताला बसायचे आणि एकनाथ शिंदे माझ्या डाव्या हाताला बसायचे मी दोघां सोबतही कामं केलेलं आहे. त्यांचे दसरा मेळाव्याचे दोघांचंही भाषण ऐकणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 05 ऑक्टोंबर : उद्धव ठाकरे माझ्या उजव्या हाताला बसायचे आणि एकनाथ शिंदे माझ्या डाव्या हाताला बसायचे मी दोघांसोबतही कामं केलेलं आहे. त्यांचे दसरा मेळाव्याचे दोघांचंही भाषण ऐकणार आहे. एकत्र भाषणाला उभे राहिले तर दोघांनाही ऐकेल, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याची उत्सुकता लागली होती ती अवघ्या काही तासांवर पोहोचली आहे. दरम्यान या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यावर अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी करत दसरा मेळाव्याचे आनंद घेणार असल्याचे म्हटलं आहे.

यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे माझ्या उजव्या हाताला बसायचे आणि एकनाथ शिंदे माझ्या डाव्या हाताला बसायचे मी दोघांसोबतही कामं केलेलं आहे. त्यांचे दसरा मेळाव्याचे दोघांचंही भाषण ऐकणार आहे. एकत्र भाषणाला उभे राहिले तर दोघांनाही ऐकणार आहे.

हे ही वाचा : रस्त्यावर भिडले अन् विमानातला आजूबाजूला बसले, शिवसेना नेत्याचा आणि शिंदे गटाच्या मंत्र्याचा VIDEO

तसंच ते पुढे म्हणाले की, एकत्र भाषणाला उभे राहिले तर दोघांनाही ऐकेल सामान्य माणसाचे प्रश्न सोडून दसरा मेळाव्यावर लक्ष वेधत आहे कुणी किती बस आणल्या, कुणी किती गर्दी केली अरे ते त्यांचा पक्ष वाढवतात. त्याचं सामान्य माणसाला काय उपयोग होणार आहे. दरम्यान या सगळ्यात दोघांनीही सामजस्याची भूमिका घ्यावी असे अजित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शहरीकरण होत असतांना सोसायटयांची संख्या वाढत गेली, सोसायट्यांमध्ये वाद वाढले. त्यामुळे आता तंटामुक्त गावाच्या धर्तीवर आता तंटामुक्त सोसायटी अभियान राबवावं लागणार आहे.  मुंबईत तर एका सोसायटीतल्या फ्लॅट धारकांने साप पाळले होते, आता साप पाळीव प्राणी आहे का? नाही हे सिद्धच झालं नाही. लोकांचा त्रास वाढला. यामुळे सोसायट्यांमध्ये सहकाराची भावना रुजली पाहिजे'

हे ही वाचा : हिंदुत्वाच्या मुद्यावर कुणाला घाबरावयाचे नाही, मात्र.., मोहन भागवत स्पष्टच बोलले

अजित पवार म्हणाले की, लोकशाहीला गालबोटं लागेल असं कुणीही वागू नये. बाळासाहेबांनीच दसरा मेळाव्यात सांगितलं होतं. आता उद्धव ठाकरेंकडे जबादारी तुम्ही त्यांना सांभाळून घ्या, हे लक्षात घायला, हवं असे अजित पवार म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar, Dasara, Eknath Shinde, Shiv sena dasara melava, Uddhav Thackeray (Politician)