मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी, भाजपच्या रडारवर आता अजितदादा? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव

मोठी बातमी, भाजपच्या रडारवर आता अजितदादा? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार...

मुंबई, 24 जून : गेल्या काही दिवसांपासून भाजप (bjp) आणि राष्ट्रवादीचे  (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (ajit pawar) यांची जवळीक असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. मात्र, असं असताना अजित पवार यांची सीबीआय (cbi) चौकशी करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या (bjp meeting) प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारविरोधात आणखी आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तसंच

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

AC मध्ये 1 ते 5 स्टार रेटिंग काय असतं? एसी घेताना समजून घ्या हे गणित, होईल फायदा

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं त्यानंतर ओबीसींचं राजकीय आरक्षणही स्थगित केलं आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक होणार आहे.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि राज्यभरातील प्रमुख चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत.

Delta plus असो की दुसरा व्हेरिएंट; कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा उपाय

या बैठकीला राज्यभरातून जवळपास चौदाशे कार्यकर्ते हजेरी लावतील. राज्यात करोनाचं संकट असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून ऑनलाइन पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते प्रदेश कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकारिणीचे सदस्य एकत्र येतील आणि तिथून ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत सहभागी होतील.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, BJP