मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे सरकार घटनाबाह्य.. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला; म्हणाले..

शिंदे सरकार घटनाबाह्य.. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला; म्हणाले..

सत्ता स्थापन करुन महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते.

सत्ता स्थापन करुन महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते.

सत्ता स्थापन करुन महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते.

    मुंबई, 2 ऑगस्ट : ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकारला येऊन महिना उलटून गेला आहे. तरी देखील अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर विरोधक सातत्याने टीका करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावरुन शिंदे सरकावर हल्लाबोल केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाकी खात्याचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. घटनेनुसार दोन मंत्र्यांचे सरकार बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस जास्तच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन महिना उलटून गेली तरीही राज्यात अजुनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे, अशी लक्षवेदना राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफांसह इतर नेते उपस्थित होते. यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विदर्भ मराठवाडा मधील अतिवृष्टीमुळेहानी झाली आहे, त्यासाठी ताबडतोब मदत दिली पाहिजे. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. परंतु, मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. सीएम आणि डिसीएमची उद्या वेळ मागितली आहे. केंद्राची टीम पाठवून पाहणी करावी अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवारांची 'ती' इच्छा पूर्ण! 2019 ची अशी केली परतफेड अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं, दीपक केसरकरांनी दिले स्पष्ट संकेत शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. लवकरच राज्यपालांना भेटून मंत्रिमंडळाची माहिती दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गैरसमज पसरवला जात आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळांची उद्या बैठक झाल्यावर विधिमंडळ कामकाज समितीची BAC बैठक होणार आहे.  याचा अर्थ पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे हे स्पष्ट संकेत आहेत. जर राज्य सरकार असं नियोजन करत असेल तर त्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ही होणार हे देखील स्पष्ट आहे. जेणेकरून नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अभ्यास करून विधिमंडळात येता येईल आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरंही देता येईल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ajit pawar, Eknath Shinde

    पुढील बातम्या