मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sunil Tatkare : रायगडमध्ये राष्ट्रवादीत होणार भूकंप? माजी आमदारानंतर नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर

Sunil Tatkare : रायगडमध्ये राष्ट्रवादीत होणार भूकंप? माजी आमदारानंतर नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर

रायगड जिल्हा मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान या बालेकिल्ल्याला भाजप सुरूंग लावण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान या बालेकिल्ल्याला भाजप सुरूंग लावण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान या बालेकिल्ल्याला भाजप सुरूंग लावण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Raigad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 30 ऑक्टोबर : रायगड जिल्हा मागच्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान या बालेकिल्ल्याला भाजप सुरूंग लावण्याची शक्यता आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा या भाजपवासी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रायगड राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांच्या कन्या गीता पालरेचा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

मागच्या तीन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसला होता. रायगडचे आमदार भरत गोगावले शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण असा सवाल विचारला जात होता. दरम्यान याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीला मोठी खींडार पडण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे हे आव्हान सुनील तटकरे परतवून लावतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला मिळणार आणखी 2कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री, 'ही' दोन नावं चर्चेत!

रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतशेठ ओसवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात जवळचे आणि खासदार सुनील तटकरे यांचेही जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कन्या आता भाजपच्या वाटेवर असल्याने सुनील तटकरे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आलेली नाही. राष्ट्रवादी पक्षाकडून विकासकामांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशा काही कारणांमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा विचार करत असल्याचे गीता पालरेचा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुनिल तटकरे यांचे पुतणे आणि माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर आता सुधागड-पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनीही भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत.

सुनील तटकरे यांचे पुतणे कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अवधूत तटकरे यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे पुतणे आहेत. अवधूत यांनी बारा वर्षे रोह्याचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. 2014 ते 2019 या काळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये चुलत बहीण व राज्यमंत्री अदिती तटकरेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. परिणामी, काही काळ अवधूत राजकारणापासून दूर राहिले आणि मध्यंतरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले होते.

First published:

Tags: NCP, Raigad, Raigad news, Sunil tatkare