मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जाधवांनंतर किशोरी पेडणेकर यांचा रामदास कदमांवर हल्ला, आता आम्ही तुमच्या आईला..

जाधवांनंतर किशोरी पेडणेकर यांचा रामदास कदमांवर हल्ला, आता आम्ही तुमच्या आईला..

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांच्यावर घणाघात केला आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांच्यावर घणाघात केला आहे.

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांच्यावर घणाघात केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई 19 सप्टेंबर : शिंदे गटातील माजी आमदार रामदास कदम यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर 100 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर तोंडसुख घेतल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांच्यावर घणाघात केला आहे. रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणालेत ते ऐका. त्यानंतर त्यांचा वर्तमानतळ सांगेन, असा हल्ला पेडणेकर यांनी केला आहे.

किशोरी पेडणेकर यांचा रामदास कदमांवर घणाघात

भूतकाळात पासूनच पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती. नारायण राणेच म्हणाले की रामदासने मला तोंडावर पाडलं, विरोधी पक्ष आणि त्याची गाडी मिळाली की टूनकण जाऊन उडी मारून बसला. तर फडणवीस म्हणाले रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती? यापूर्वी दोनदा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार होता. आता मात्र 12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपणा करणारे हे नेते, अशी टाकी पेडणेकर यांनी केली.

पुढे त्या म्हणाल्या, की बाळासाहेब जेव्हा ऐकायचे नाही तेव्हा वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे. आता किचनपर्यंत त्यांची जीभ सुटली. हा भाई म्हणण्याचा पण लायकीचा नाही. बरं झालं घाण गेली. आमच्या महिलांच्या नजरेतून ते उतरले. नालायक निघालात. राक्षसी वृत्ती दाखवली. तुम्ही स्वतःच्या मुलाला आमदार केलं. तुम्ही स्वतःच्या बापाचं नाव लावता. आता आम्ही तुमच्या आईला विचारायला जायचं का हे कसं? तुम्हाला नाही पटलं तर जिथे जायचं तिथे जा, पण आपले घाण संस्कार दाखवू नका. आदित्यने लग्न करायचं की नाही हे त्याचे आई-वडील बघून घेतील. तुम्ही त्यावर भाष्य करणारे कोण?

वाचा - 'त्यांना' वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा; भास्कर जाधवांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

दसरा मेळावा ही आमची परंपरा : किशोरी पेडणेकर

दसरा मेळावा ही आमची परंपरा आहे. ते करण्यासाठी जर सत्तेचा माज दाखवून आमची कोंडी करणार असाल तर उद्धव ठाकरे आणि आम्ही शिवसैनिक मेळावा घेणार. महापालिका आयुक्तांना आमचे काही नेते भेटणार होते. वेळ पडली तर कोर्टात जावं लागेल. उद्या उत्स्फूर्त शिवसैनिक शिवतीर्थावर आला तर त्याला कोणीही थांबू शकत नाही. स्टेज असो वा नसो पण तिथे सगळे एकमेकांना भेटतील. उत्स्फूर्त दसरा मेळावा होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी आम्ही घेतोय. म्हणून परवानगी मागतोय. आशिष शेलार ठोसाठोशीची भाषा करतात. त्यांना कायदा सुव्यवस्था बिघडवायचे आहे आणि राष्ट्रपती राजवट लावायची आहे हे लोकांना कळते. आम्ही सैनिक आहोत परंपरेने दसरा मेळावा करत आलो आहोत.

फॉक्सकॉन घेऊन गेले आणि महाराष्ट्राला फक्त पॉपकॉर्न ठेवलंय : पेडणेकर

फॉक्सकॉन घेऊन गेले आणि महाराष्ट्राला फक्त पॉपकॉर्न ठेवलंय. MOU पर्यंत ठरलेली गोष्ट अचानक असं काय घडतं की कंपनी दुसऱ्या राज्यात जाते. मे महिन्यापासून ते पाच सप्टेंबर पर्यंत यांचे सरकार MOU करायला निघालं होतं. तेव्हा दहा टक्क्याचे विषय कसे निघाले नाहीत. मग फिस्कटल कुठं? सगळे मोठे प्रोजेक्ट इकडे तिकडे जातील महाराष्ट्राच्या हातात पॉपकॉर्न राहतील.

First published:

Tags: Ramdas kadam, Shivsena